जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहिमेला सुरुवात मोहिमेला सुरुवात

 

रायगड दि.20 (जिमाका):- जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहिमेला आज पासून सुरुवात करण्यात आली आहे. ही मोहिम दि.6 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान आशासेविका, स्वंयसेवक व आरोग्य कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरुग्ण व क्षयरोग रुग्ण शोधणार आहे. जनजागृती, तपासणी व उपचार या त्रिसुत्रीने संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिल्या आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे पाटील व सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग डॉ.प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत 354 पर्यवेक्षकांच्या नेतृत्वाखाली 1 हजार 913 पथके स्थापन करण्यात आली आहेत.

 

कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 24 लाख 56 हजार 871 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, गृहभेटी दरम्यान 5 लाख 69 हजार 492 घरांचे भेटीचे नियोजन केले आहे. 1 हजार 958 पथके तयार करण्यात आली आहेत. मोहिमेंतर्गत घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोग व क्षयरोग संदर्भात संपुर्ण शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे. सोमवारी जिल्ह्यात जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

या मोहिमेंतर्गत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. नवीन कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच क्षयरोगाचे निदानाअभावी अद्यापही वंचित असणा-या क्षयरुग्णांचा शोध घेवून त्यांना क्षयरोग औषधोपचाराखाली आणणे व संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुणे व एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करून क्षरोगाचे निदान करण्यात येणार आहेत.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक