करोना विषाणू प्रादूर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी संसाधने उपलब्ध



अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका) : करोना विषाणू प्रादूर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी  आरोग्य विभागाकडून तसेच काही सामाजिक संस्थाकडून जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे विविध संसाधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ही संसाधने किती प्रमाणात मिळाली व त्याचे वितरण कोणाकोणाला झाले, त्याची माहिती पुढीलप्रमाणे--
            पीपीई किट- प्राप्त संख्या 1 हजार 377, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय यांना पुरविण्यात आलेली संख्या- 987, जिल्हा रुग्णालयाकडे शिल्लक -390, एन-95 मास्क- प्राप्त संख्या 12  हजार 080, ,  ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय यांना पुरविण्यात आलेली संख्या- 1 हजार 680, जिल्हा रुग्णालयाकडे शिल्लक – 10 हजार 400, सॅनिटायजर (500 मिली)- प्राप्त संख्या 1 हजार 500, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय यांना पुरविण्यात आलेली संख्या- 300, जिल्हा रुग्णालयाकडे शिल्लक -1 हजार 200, हायड्रॉक्झि-क्लोरोक्विन गोळया- प्राप्त संख्या 12 हजार 800, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय यांना पुरविण्यात आलेली संख्या- 6 हजार 800, जिल्हा रुग्णालयाकडे शिल्लक -6 हजार, हॅण्डवॉश (5 लिटर)- प्राप्त संख्या 1 हजार 300 कॅन, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय यांना पुरविण्यात आलेली संख्या- 200 कॅन, जिल्हा रुग्णालयाकडे शिल्लक -1 हजार 100 कॅन, डिस्पोजेबल मास्क - प्राप्त संख्या 19 हजार, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय यांना पुरविण्यात आलेली संख्या- 11 हजार, जिल्हा रुग्णालयाकडे शिल्लक -8 हजार.
            त्याचप्रमाणे युवा प्रतिष्ठान रोहा यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला 3 हजार पीपीई किट देण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार पीपीई किट पनवेल कोविड रुग्णालयासाठी तर प्रत्येक उप जिल्हा रुग्णालयांसाठी (पेण, कर्जत, माणगाव, रोहा, श्रीवर्धन, पनवेल) प्रत्येकी 100 आणि प्रत्येक ग्रामीण रुग्णालयांसाठी  (महाड, मुरुड, कशेळे, चौक, पोलादपूर, जसवली, उरण, म्हसळा, न.पा.द. खोपोली, न.पा.द. माथेरान) प्रत्येकी 50 पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उर्वरित 900 पीपीई किट जिल्हा प्रशासनाकडे शिल्लक आहेत 
स्वदेस फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्हा प्रशासनाला 1 लाख ट्रिपल लेयर मास्क, 5 हजार N-95 मास्क, 2 हजार 500 पीपीई किट आणि 2 थर्मल स्कॅनर देण्यात आले होते. ही सर्व संसाधने पनवेल येथील उप जिल्हा रुग्णालय (जिल्हा कोविड रुग्णालय, पनवेल), ग्राम विकास भवन (खारघर), इंडिया बुल्स (कोन गाव), सुअस्थ हॉस्पिटल (कळंबोली), एमजीएम रुग्णालय (कामोठे) यांना पुरविण्यात आले आहेत.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक