मासेमारी बंदी कालावधीत यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी करताना आढळल्यास होणार कठोर कारवाई


वृत्त क्रमांक :- 902                                                             दिनांक :- 01 जुलै 2020

अलिबाग, जि.रायगड (जिमाका) दि.01 :- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी दि.1 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीकरिता शासनाच्या कृषी व पदुम आणि मत्स्यव्यवसाय विभागाने दि.1 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) मासेमारी बंदी कालावधी निश्चित केला आहे. 
यानुसार राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यत) यांत्रिकी मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आल्याचे यापूर्वी सर्व सागरी मच्छिमारी संस्थांना पत्राद्वारे तसेच स्थानिक वृत्तपत्रांद्वारे जाहीर आवाहन केले होते, असे असतानाही पावसाळी बंदी कालावधीत मासेमारी चालू असल्याच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.
            या तक्रारीच्या अनुषंगाने मासेमारी बंदी कालावधीत यापुढे कोणत्याही प्रकारच्या यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी करताना आढळल्यास त्या नौकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच त्या नौकांचा मासेमारी परवाना रद्द करुन नौकांची नौका नोंदणी रद्द करण्यात येईल, याची जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांनी कटाक्षाने नोंद घ्यावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश भारती यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक