एम.एम.आर.डी.ए. कडील रिक्तपदांच्या भरतीकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन



             अलिबाग, जि.रायगड (जिमाका) दि.01 :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर कार्यालय, मुंबई यांच्यामार्फत कुशल/अकुशल उमेदवारांसाठी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  हा मेळावा दिनांक 08 ते 12 जुलै 2020 या कालावधीत सकाळी 10.00  ते सायंकाळी 06.00  या वेळेत फक्त कौशल्य विकास व उद्योजकता या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. 
या मेळाव्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, (M.M.R.D.A.) वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई- यांच्याकडील विविध प्रकारची पदे भरावयाची आहेत. या पदांमध्ये गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्सींग करणारे),  फिटर (बार बेंडींग व फिक्सींग करणारे), वेल्डर, ईलेक्ट्रीशियन, वायरमन, आणि अकुशल कामगार (श्रमीक) या पदांचा समावेश आहे.
 जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता  विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर या वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील आपली सर्व माहिती अद्यावत करावी. तसेच ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेब पोर्टलवर Employment-Job Seeker (Find a Job)-Register या ऑप्शन्सवर क्लीक करुन सर्व अद्यावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर नोंदणी करताना भरलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरुन वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login मध्ये Registration Id (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड भरुन Login वर क्लीक करावे. त्यानंतर दिसणा-या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लीक करुन वेबपोर्टलवर दिसणा-या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील Mumbai Sub Urban जिल्हा निवडून त्यातील Action-view details  या ऑप्शनमध्ये मध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व vacancy listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लीक करावे, त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्तपदांकरीता Apply वर क्लीक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ.माहिती प्राप्त होते. त्यामुळे त्यांचेकडील रिक्तपदांकरीता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेणेकरीता आपणाशी संपर्क साधणे शक्य होते, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग शा. गि. पवार यांनी केले आहे. आपणास पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी काही समस्या येत असेल तर या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 या वर संपर्क साधावा.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक