सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

 

 

रायगड,दि.25(जिमाका):- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण हे शनिवार, दि.27 जानेवारी 2024 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 27 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.30 वा. पलावा, डोंबिवली येथून शासकीय वाहनाने अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव. दुपारी 3.00 वा. कमळ नागरी पतसंस्था, अलिबाग आणि सतिश धारप यांच्या विशेष प्रयत्नातून कमळ सेवा संस्था संचलित डायलिसिस सेंटर च्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थिती. स्थळ : कमळ सेवा संस्था, म्हाडा कॉलनी, श्रीबाग नं.2 अलिबाग. दुपारी 3.30 वा अलिबाग येथून माणगाव, जि.रायगडकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 वा. माणगाव येथे आगमन व माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सी.बी.एस.ई.स्कूल च्या भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : अमित कॉम्प्लेक्स समोर, निजामपूर रोड, माणगाव. सायं.6.00 वा. माणगाव येथून पलावा, डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक