पशुधनाच्या नोंदणीसाठी पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

 

 

रायगड,दि.25(जिमाका):- रायगड जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांमार्फत पशुधनास tagging भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यातील पशुपालक, शेतकरी यांनी पशुधनास tagging व online नोंदणीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करून आपल्या पशुधनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन, रायगड-अलिबाग डॉ.सचिन देशपांडे यांनी केले आहे.

भारत पशुधन प्रणालीवर पशुधन नोंदणी (Animal Registration), पशुपालक नोंदणी (Owner Registration), पशुपालक हस्तांतरण नोंदणी (Owner Transfer) पशुधनाच्या नोंदीत बदल (Search and modify animal) ,कानातील tag बदल नोंदी (Tag change), पशुपालकांच्या नावातील बदल (Search and Modify Owner) या बाबींचा समवेश आहे. यासाठी आवश्यक tag जिल्ह्यात उपलब्ध आहेत.

दि.05 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार दुध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रती लिटर रु. 5 /-अनुदान देय आहे. यासाठी  पात्र पशुधनास कानात Tagging करून भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी  करणे अत्यावशक आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक