“सामाजिक समता पर्व” कार्यक्रमांतर्गत पथनाट्याच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांची जनजागृती

 

 

अलिबाग,दि.19 (जिमाका):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.1 एप्रिल ते दि.1 मे 2023  या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन सामाजिक समता पर्व कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे.

त्यानुषंगाने समाज कल्याण विभागाच्या विविध योजना मागासवर्गीय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यात शुक्रवार, दि.14 एप्रिल 2023 रोजी अलिबाग बीच, गृहपाल, मुलांचे शासकीय वसतिगृह अलिबाग श्री.संदिप कदम, श्रीमती उषा गुजेला, समतादूत श्रीमती रश्मी भोईर, अलिबाग. शुक्रवार, दि.14 एप्रिल 2023 रोजी एसटी बस स्थानक महाड, गृहपाल, मुलांचे शासकीय वसतिगृह, महाड श्री.अनिल मोरे, गृहपाल, मुलींचे शासकीय वसतिगृह महाड श्रीमती सुधा सावंत.

मंगळवार, दि.18 एप्रिल 2023 रोजी एस.टी. बस स्थानक खोपोली, गृहपाल, मुलींचे शासकीय वसतिगृह, पाली-सुधागड श्रीम.मिनाक्षी येमले, समतादूत खालापूर श्रीमती मनिषा कळके, समतादूत पाली-सुधागड श्री.अमोल म्हात्रे.

बुधवार, दि.19 एप्रिल 2023 एसटी बस स्थानक पनवेल, गृहपाल, मुलींचे शासकीय वसतिगृह, पाली-सुधागड श्रीम.मिनाक्षी येमले, समतादूत पनवेल श्री.सदानंद जाधव, समतादूत पनवेल श्रीमती रागिणी साखरकर.

गुरुवार,दि.20 एप्रिल 2023 एसटी बस स्थानक पेण, कार्यालय, अधीक्षक श्रीमती माधुरी पाटील, कनिष्ठ लिपिक श्रीमती राजेश्री म्हात्रे, समतादूत पेण श्रीमती अनुजा पाटील, समतादूत अलिबाग श्रीमती रश्मी भोईर, अशा प्रकारे सहायक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याने आणि सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, समतादूत, सामाजिक कार्यकर्ते यांच्या समन्वयातून पथनाट्याचे कार्यक्रम सादर करण्यात आले. या पथनाट्यांच्या सादरीकरणातून सामाजिक न्याय विभागाच्या अनूसूचित जातीतील नवउद्योजकांना स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत मार्जिंन मनी, पद्दश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे, वृध्दाश्रम योजना, कन्यादान योजना, रमाई आवास घरकुल योजना अशा विविध लोकोपयोगी योजनांबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात आली.  

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक