भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण कार्यालयामार्फत “वॉकथॉन-2023” जल्लोषात संपन्न

 

 

अलिबाग,दि.19 (जिमाका) :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता पर्व कार्यक्रमांतर्गत दि.14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयापासून अलिबाग बीचपर्यंत पदयात्रा वॉकथॉन-2023 सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रायगड जिल्हा न्यायालयाचे सत्र न्यायाधीश जगदीश कोकाटे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री. सुनिल जाधव, अलिबाग पोलीस निरीक्षक श्री.शैलेश सणस यांच्या हस्ते माल्यार्पण करुन वॉकथॉन-2023 ला सुरुवात झाली.

 या वॉकथॉन-2023 मध्ये सत्र न्यायाधीश श्री.जगदीश कोकाटे, सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव,  संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रायगड श्री.रवीकिरण पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, श्री.नितिन मंडलिक, अलिबाग पोलीस निरीक्षक श्री.शैलेश सणस, मांडवा पोलीस निरीक्षक श्री.राजू पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.राजाराम हुलवान, जे.एस.एम. कॉलेजचे प्राध्यापक प्रा.प्रेम आचार्य, अलिबाग येथील मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल संदीप कदम, अलिबाग मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल श्रीम.उषा गुजेला तसेच कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, कार्यालयाच्या अधिनस्त मुलींचे-मुलांचे शासकीय वसतिगृहाचे कर्मचारी, जेएसएम कॉलेजचे विदयार्थी/ कर्मचारी त्याचप्रमाणे अलिबाग मधील प्रशासकीय अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वॉकथॉन-2023 च्या समारोपावेळी सत्र न्यायाधीश श्री.जगदीश कोकाटे व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन उपस्थित सर्वांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार व कार्याविषयी प्रबोधित केले. त्यानंतर पथनाटय सादरीकरणातून समाज कल्याण विभागाच्या योजनांची जनजागृती करण्यात आली. त्यानंतर अलिबाग बीच येथे स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक