“सामाजिक न्याय पर्व” अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन

 

अलिबाग, दि.19(जिमाका) :-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमांतर्गत मंगळवार, दि. 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जंजिरा हॉल, पोलीस ग्राऊड, अलिबाग येथे या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, सफाई कर्मचारी व त्यांचे पुनर्वसन कायदा 2013 जनजागृती, अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याबाबत जनजागृती करणे, व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार, या विषयांची कार्यशाळा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यशाळेसाठी समाज कल्याण, पोलीस विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सुनिल जाधव यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक