महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत

 

 

अलिबाग, दि.19(जिमाका) :-अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लोकांना स्वयंरोजगारासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ विविध योजना राबवित असते. या महामंडळामार्फत राबवित असलेल्या योजनांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

50 टक्के अनुदान योजना- प्रकल्प मर्यादा रु.50 हजार पर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 हजार पर्यंत अनुदान देण्यात येते.  बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.

 बीजभांडवल योजना- प्रकल्प मर्यादा रु.50 हजार 1 ते 5 लाखपर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बीजभांडवल कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के द.सा.द.शे. व्याज दराने देण्यात येते. राशीमध्ये महामंडळाचे अनुदानाचा रु. 10 हजारचा समावेश आहे,

 बँकेचे कर्ज 75 टक्के देण्यात येते व त्या कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो, महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षाचे आत करावी लागते, अर्जदारास 5 टक्के स्वतः चा सहभाग भरावयाचा आहे.

अर्ज करण्यास आवश्यक पात्रता- अर्जदार अनुसूचित जाती/नवबौध्द संवर्गातील असावा व त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे, राज्य महामंडळाच्या योजनेकरिता वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी व ग्रामीण भागाकरिता रुपये 3 लाख असावी, अर्जदार हा महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा (राज्य/केंद्र) थकबाकीदार नसावा.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे- जातीचा व उत्पन्नाचा सक्षम अधिकर यांनी दिलेला दाखला,2 पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड, व पॅनकार्ड, व्यवसायाचे कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा. व्यवसायानुरूप इतर आवश्यक दाखले, आवश्यकते प्रमाणे प्रकल्प अहवाल, व्यवसायानुरुप आवश्यकते प्रमाणे इतर दाखलेपत्र. उदा. वाहनाकरीता व व्यवसायाकरीता लायसन्स, परमिट बॅज नंबर इ., जनधन योजनेचे खाते क्रमांक व पासबुक ची झेरॉक्स.

या योजनेच्या अधिक माहितीकरिता महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, कृष्ण संगम बिल्डींग चेंढरे अलिबाग-बायपास रोड, पहिला मजला, ब्लॉक नं.103 अलिबाग या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.आर.म्हसकर यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक