राष्ट्रीय लोक अदालतीचा नागरिकांनी लाभ घ्यावा--प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस.सांवत

 

 

अलिबाग,दि.20(जिमाका) :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि.30 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्री.अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीज वितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे तसेच इत्यादी वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

तरी दि.30 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग श्रीमती एस. एस. सांवत यांनी केले आहे.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक