दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर श्रीवर्धन न्यायालयाच्या प्रस्तावित नूतन इमारतीचा भूमीपूजन समारंभ येत्या रविवारी

 

 

अलिबाग,दि.21(जिमाका) :- दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर श्रीवर्धन या न्यायालयाच्या प्रस्तावित नूतन इमारतीचा भूमीपूजन समारंभ उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती,जि.रायगड श्री.मिलिंद म.साठ्ये यांच्या शुभहस्ते व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड - अलिबाग श्रीमती शैलजा श.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि.23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता संपन्न होणार आहे.

       सध्या श्रीवर्धन येथील दिवाणी न्यायालय हे भाडे तत्त्वावर घेतलेल्या जागी सुरू आहे.  गेल्या सुमारे 30 ते 35 वर्षे श्रीवर्धन न्यायालयाची स्वतंत्र वास्तू उभारण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न सुरू होते. दि.26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार  शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून श्रीवर्धन येथे न्यायालयाची इमारत व न्यायाधीशांसाठी निवासस्थान बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार तळमजला अधिक दोन मजले अशी 3511.80 चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाची न्यायालयाची इमारत बांधण्यात येणार आहे.

०००००००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक