अलिबाग तालुक्यात स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन सर्व्हे सनद वाटप कार्यक्रम

 

 

अलिबाग,दि.19(जिमाका):- शासनाचा स्वामित्व योजना गावठाण भूमापन हा महत्त्वपूर्ण प्रकल्प महाराष्ट्रात यशस्वीरित्या सुरु आहे.  या कामी संपूर्ण महाराष्ट्रात जनतेकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.  त्यानुसार रायगड जिल्ह्यातील उप अधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग या कार्यालयाकडील अलिबाग तालुक्यातील 140 गावाचे स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन सर्व्हे झालेला आहे.  साधारण 80 गावांचे चौकशी काम पूर्ण झाले आहे.  तसेच चौकशी कामानुसार एकूण 13 गावाचे सनद (मालकी हक्काचा पुरावा) हा तयार झालेला असून ते सर्व घराचे मालक, धारक यांना वाटपाचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.

             अलिबाग तालुक्यातील संपूर्ण 140 गावांची सनद तयार करून पूर्ण शंभर टक्के लोकांना त्यांच्या घरापर्यंत सनद मे 23 अखेर पोहचविण्याचे उद्दिष्ट उपसंचालक भूमी अभिलेख कोकण प्रदेश, कोकण (मुंबई) श्री.जयंत निकम यांनी अलिबाग तालुक्याला दिलेले असून त्यानुषंगाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग श्री.सचिन इंगळी यांच्या मार्गदर्शनानुसार अलिबाग तालुक्यात विशेष मोहीम घेऊन प्रत्येक गावात सनद वाटप कार्यक्रम सुरु केला आहे असून त्यास जनतेचा चांगला मिळत आहे.

              या कामी वसुलीसाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे शिरस्तेदार श्री.बाळासाहेब दुरगडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्याचप्रमाणे संबंधित गावांचे ग्रामविकास अधिकारी यांच्या सहकार्याने सनद वसुली झालेली आहे.  

              याकामी सर्व मोहिमेचे नियोजन व जनतेच्या शंका समाधान कामी उपअधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग श्री.प्रदीप जगताप स्वतः हजर राहून कामकाज पाहत आहेत.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक