प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेतील पात्र लाभार्थीचा डाटा पी.एम.किसान पोर्टलवर अद्ययावत करावा

 


 

अलिबाग,दि.08 (जिमाका):- केंद्र शासनाने माहे डिसेंबर-मार्च 2022 कालावधीतील 13 व्या हप्त्याच्या वितरणाचे नियोजन करण्यासाठी दि.02 डिसेंबर 2022 रोजी दूरचित्रवाणी परिषद आयोजित केली होती. या दूरचित्रवाणी परिषदेमध्ये राज्यातील पात्र लाभार्थीचा डाटा दि. 15 डिसेंबर 2022 पर्यंत भूमि अभिलेख प्रमाणे अद्यावत करून पोर्टलवर अपलोड करण्याचे तसेच अपात्र लाभार्थ्यांना पोर्टलवर मार्क करण्याचे निर्देश दिले आहेत.

सद्य:स्थितीत राज्यातील एकूण 100.57 लाख पात्र लाभार्थ्यांपैकी 7.99 लाख पात्र लाभार्थीच डाटा (Eligible Punding for Land Details Seeding) राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे अद्ययावत करून अद्यापही अपलोड करण्यात आलेला नाही. त्यामुळे पात्र लाभार्थी 12 हप्ता वितरणावेळी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. केंद्र शासन स्तरावर शासनाने माहे डिसेंबर-मार्च 2022 कालावधीतील 13 व्या हप्त्याच्या वितरणाची कार्यवाही सुरू असून दि. 15 डिसेंबर 2022 पर्यंत या लाभार्थीचा डाटा भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे अद्यावत झाल्यासच त्यांना पुढील लाभ देय राहील, असे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे.

या अनुषंगाने राज्याच्या 7.99 लाख पात्र लाभार्थीपैकी (Eligible Pending, for Land Demails Seeding) निकषांप्रमाणे ज्या लाभार्थीचे भूमी अभिलेख RoR मध्ये उपलब्ध आहेत त्यांची माहिती दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अद्ययावत करून पोर्टलवर अपलोड करावे. तसेच यापैकी अपात्र म्हणून निदर्शनास आलेल्या लाभार्थीना खातरजमा करुन पोर्टलवर अपात्र करण्याची तात्काळ कार्यवाही करावी. याप्रमाणे ही कार्यवाही दि. 15 डिसेंबर 2022 पर्यंत पी.एम.किसान पोर्टलवर पूर्ण करण्यात यावी, म्हणजे 13 व्या हप्त्याच्या वितरणाचे नियोजन करणे सोईचे होईल, असे कृषी आयुक्त तथा पी.एम.किसान, महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख श्री.सुनिल चव्हाण यांनी कळविले आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यातील एकूण 1 लाख 17 हजार 65 पात्र लाभार्थ्यांपैकी 1 लाख 15 हजार 841 पात्र लाभार्थ्यांचा डाटा भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे अद्ययावत करण्यात आला आहे. तर अद्याप 1 हजार 224 पात्र लाभार्थ्यांचा डाटा भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे अद्ययावत करून अपलोड करण्यात आलेला नाही. माहे डिसेंबर-मार्च 2022 कालावधीतील 13 व्या हप्त्याच्या वितरणाची कार्यवाही सुरू असून दि. 15 डिसेंबर 2022 पर्यंत उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी आपला डाटा भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे अद्ययावत करुन घ्यावा, अशा सूचनाही कृषी आयुक्त तथा पी.एम.किसान, महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख श्री.सुनिल चव्हाण यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक