जिल्हा प्रशासनाकडून 300 आपदा मित्रांना देण्यात येणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

 


 

            अलिबाग,दि.09(जिमाका):-  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,नवी दिल्ली यांच्याकडून राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये आपदा मित्रांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातून 300 आपदा मित्रांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे.

यासाठी आपदा मित्रांची निवड करावयाची आहे. जिल्हयातील माजी सैनिक, राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी. विद्यार्थी, नेहरू युवा केंद्राचे युवक-युवती, होमगार्ड, पोलीस मित्र, जीवरक्षक, सागरी सुरक्षा दलातील स्वयंसेवक, नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये कार्य करण्यास इच्छुक असणारे युवक-युवतीं इनाव नोंदणी करू शकतात. प्रशिक्षणासाठी इच्छुक स्वयंसेवकाचे वय 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत असावे. प्रशिक्षणार्थी 12 दिवसांचे निवासी प्रशिक्षण पूर्ण करण्यास तयार असावा. प्रशिक्षणानंतर प्रशासनास आपत्कालीन प्रसंगी सहकार्य करण्यास तयारी असावी. आपदा मित्रांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येवून त्यांचा रू.5 लाख रक्कमेचा अपघाती विमा उतरविण्यात येणार आहे.

यासंबंधी अधिक माहितीसाठी 02141-222097 या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा व जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक/युवती यांनी संबंधित तहसिलदार कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक