के.एम.सी.महाविद्यालय खोपोली येथे नवमतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर संपन्न

 

 

अलिबाग,दि.08 (जिमाका) :-जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड-अलिबाग डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशान्वये व उपजिल्हा निवडणूक अधिकारी रायगड-अलिबाग श्रीमती स्नेहा उबाळे,  उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी 189 कर्जत विधानसभा मतदार संघ  अजित नैराळे यांच्या सूचनेप्रमाणे तसेच तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी खालापूर आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कार्यालय खालापूर व के.एम.सी.महाविद्यालय खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी  दि.7 डिसेंबर2022 रोजी मतदार नोंदणी  शिबिर संपन्न झाले.

या शिबिर कार्यक्रमासाठी तहसिल कार्यालय खालापूर येथील नायब तहसिलदार निवडणूक श्री.दशरथ भोईर, मंडळ अधिकारी खोपोली श्री.सचिन वाघ, गटशिक्षणाधिकारी, खालापूर श्रीम.शिल्पा दास तसेच प्राचार्य श्री.प्रताप पाटील, प्राध्यापक, श्री.संजय दायरे, प्राध्यापिका श्रीमती मिनाक्षी ओसवाल व के.एम.सी. महाविद्यालय खोपोलीचे अन्य प्राध्यापक वर्ग तसेच तलाठी श्री.रणजीत कवडे, श्रीम दिप्ती चोणकर हे उपस्थित होते.

यावेळी नायब तहसीलदार श्री.दशरथ भोईर यांनी मतदार नोंदणी कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांना मागदर्शन केले.  तसेच मतदानाचे महत्व, NVSP Portal व व्होटर हेल्पलाईन ॲपबाबत मागदर्शन करुन पात्र नवमतदारांची मतदार नोंदणी अर्ज भरुन घेण्यात आले.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक