मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत मुंबई, पनवेल येथून अंदाजित रु.8 लाख 57 हजार 860 किंमतीचा मुद्देमाल जप्त

 


 

अलिबाग,दि.08(जिमाका):- राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी,  राज्य उत्पादन शुल्क संचालक श्री.सुनिल चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग ठाणे विभागीय उपायुक्त श्री.प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर अधीक्षक श्री. प्रविण कुमार तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, एच विभाग, मुंबई शहर निरीक्षक यांना रुम नं.205, दुसरा मजला, शितला देवी दर्शन, 11 वी गल्ली कामाठीपुरा मुंबई सेंट्रल, मुंबई या ठिकाणी बनावट विदेशी मद्य तयार केले जाते, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दि.05 डिसेंबर 2022 रोजी छापा मारुन बनावट विदेशी मद्याच्या सिलबंद व रिकाम्या बाटल्या, भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या सिलबंद बाटल्या, मोबाईल व बनावट मद्य वाहतूक करुन विक्री करण्याकरिता वापरत असलेले दुचाकी वाहन असा एकूण अंदाजित किंमत रु. 1 लाख 64 हजार 660 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या गुन्ह्यात आरोपी राज अशोक वाघेला, वय 20 वर्षे यास ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला. या आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने तपासादरम्यान दिलेल्या माहिती वरुन शॉप नं. 1, मेगा नेक्सेस बिल्डींग, प्लॉट नं. 304, सेक्टर 19, उलवे, नवी मुंबई, पनवेल येथे छापा घालून रु.3 लाख 96 हजार 480 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दोन आरोपी रमेश परमेश्वर तियर, वय 35 वर्षे व निशांत नारायण केके, वय 30 वर्षे यांनाही अटक करण्यात आली. हे दोन्ही आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांचे राहते घर क्र. 813, मु.पो.पाटणोली, ता.पनवेल, जि.रायगड येथे छापा घालून रु. 2 लाख 96 हजार 720 किंमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.  या तीनही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ब) (क) (ड) (ई) (फ) 81, 83 व 90, अन्वये अटक करुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अंदाजित किंमत रु.8 लाख 57 हजार 860 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, एच विभाग, मुंबई शहर निरीक्षक श्री.जनार्दन खिल्लारे यांनी केली असून कारवाई दरम्यान राज्य उत्पादन शुल्क, आय विभाग, मुंबई शहर निरीक्षक श्री.आनंद पवार, दुय्यम निरीक्षक श्री.अमोल पराडकर, विनोद जाधव, श्रीमती श्रुती कानडे, श्रीमती प्रज्ञा राणे व सर्वश्री जवान योगेश यादव, विशाल रणपिसे, सचिन पवार, विलास चौधरी, विनोद अहिरे, जी.डी.पवार यांनी सहकार्य केले. गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क, एच विभाग, मुंबई शहर निरीक्षक श्री.जनार्दन खिल्लारे करीत आहेत.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक