जे.एस.एम.च्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरात आरोग्य तपासणी संपन्न

 



          अलिबाग, दि.09(जिमाका):- अलिबाग तालुक्यातील मौजे मानीभुते येथे जे.एस.एम.महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या श्रमसंस्कार शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांची एच.आय.व्ही.एड्स व सिकलसेल तपासणी व किशोरवयीन मुलांच्या समस्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी मनिभुते ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अस्मिता म्हात्रे, एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री. संजय माने, समुपदेशिका सौ.अपर्णा करंदीकर, समुपदेशक श्री सचिन जाधव, सिकलसेल समुपदेशक श्री प्रतिम सुतार, टेक्निशियन सौ.सुजाता तुळपुळे, रुपेश म्हात्रे, श्री अतिश नाईक, सौ.रुचिता म्हात्रे, सौ.मीनाली साळवकर रेश्मा म्हात्रे, दीपा म्हात्रे, तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रविण गायकवाड, डॉ.सुनील आनंद, डॉ. प्रीती फाटे, प्रा. संतोष हाके तसेच एच. आय. व्ही.  व स्वयंसेवक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री.संजय माने यांनी एच.आय.व्ही.एड्स विषयी मागदर्शन व समुपदेशन करताना विद्यार्थ्यांना सांगितले की, प्रत्येकाने लग्नापूर्वी ब्रह्मचार्य वृत्त पाळावे व लग्नानंतर जोडीदाराशी एकनिष्ठ राहावे, जेणेकरून कोणालाही एच.आय व्ही.ची लागण होणार नाही. त्यानंतर श्री.प्रतिम सुतार यांनी सिकलसेल याविषयी मार्गदर्शन केले.  यामध्ये सिकलसेल आजाराची करणे लक्षणे याविषयी समुपदेशन केले.

सौ. अपर्णा करंदीकर यांनी विद्यार्थ्यांना किशोरवयीन मुलांच्या समस्या याविषयी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांशी त्यांच्या शंका व प्रश्नाबाबत चर्चा केली.  त्यानंतर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या  आणि मानीभुते गावतील ग्रामस्थांच्या एच.आय.व्ही.एड्स तपासणी करण्यात आली. यामध्ये 80 विद्यार्थी व 20 ग्रामस्थ यांची एच.आय.व्ही ची तपासणी करण्यात आली.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दिव्या धिवरे या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले.

या आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रविण गायकवाड, डॉ. सुनील आनंद, डॉ. सौ. मिनल पाटील यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक