मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम मतदार साक्षरता आणि निवडणुकीत सहभाग मोहिमेंतर्गत जिल्हास्तरीय विद्यार्थी कार्यशाळा संपन्न

 


 

अलिबाग,दि.08 (जिमाका):  मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 01 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. दि.09 नोव्हेंबर 2022 ते दि.08 डिसेंबर 2023 या कालावधीत पुढीलप्रमाणे कार्यक्रम राबविला जाणार आहे.

एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी करणे-बुधवार, दि.09 नोव्हेंबर 2022 रोजी, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी–बुधवार, दि.09 नोव्हेंबर 2022 ते गुरुवार, दि.08 डिसेंबर 2023, संक्षिप्त पुनरिक्षण काळात विद्यार्थी, दिव्यांगमहिला, देह व्यावसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती, तृतीयपंथी या लिक्षित घटकांसाठीची विशेष शिबिरे-शनिवार, दि. 12 नोव्हेंबर  2022, व रविवार, दि.13 नोव्हेंबर, 2022, शनिवार, दि.26 नोव्हेंबर 2022 व रविवार, दि.27 नोव्हेंबर 2022, मतदार नोंदणीसाठीची 4 विशेष शिबिरे- दि.19 व 20 नोव्हेंबर 2022 आणि दि.03 व 04 डिसेंबर 2022, दावे व हरकती निकालात काढणे- दि.26 डिसेंबर 2022 (सोमवार) पर्यंत, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे- गुरुवार, दि.05 जानेवारी, 2023.

 जिल्हयात सर्व तालुक्यात विद्यार्थी महिला व दिव्यांग, देहविक्रय व्यक्ती, तृतीयपंथी, भटक्या जमाती तसेच आदिवासी कातकरी व्यक्तींसाठी शिबिरे आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये मोठया प्रमाणात नवीन मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्ती अर्ज भरून घेण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय विदयार्थी कार्यशाळेचे दि.05 डिसेंबर 2022 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत रायगड जिल्हयातील सर्व महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळाचे नोडल अधिकारी, विदयार्थी प्रतिनिधी, कॅम्पस अँबेसिडर व जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थित नोडल अधिकारी, विद्यार्थी प्रतिनिधींना उपजिल्हाधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड श्रीमती स्नेहा उबाळे यांनी नवीन मतदार नोंदणी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले व मतदार नोंदणी का करावी, याचे महत्व सांगितले. तसेच दि. 01 ऑगस्ट 2022  पासून मा.भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्रासोबत आधारक्रमांक जोडणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच आता वर्षातून चार वेळा म्हणजेच दिनांक 1/1, 1/4, 01/07, 01/10 या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी करता येणार आहे.

जे.एस.कॉलेज,अलिबाग, सी.के.टी.विद्यालय पनवेल, लक्ष्मीनारायण विद्यालय पेझारी येथील नोडल अधिकारी यांनी आपले मनोगत व अनुभव, नियोजन उपस्थितांसमोर व्यक्त केले.

तसेच उपस्थित नोडल अधिकारी, विद्यार्थी प्रतिनिधी यांना डाटा एन्ट्री ऑपरेटर अंकित पाटील व डाटा ऑपरेटर, संकेत सुंकले यांच्यामार्फत नवीन मतदार नोंदणी कशी करावी, यासाठी NVSP Portal व VHA APP बदल Presentation दाखवून माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थी प्रतिनिधींना आपल्या मार्फत महाविद्यालयामध्ये 100 टक्के मतदार नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. सर्व नवमतदारांना जिल्हा किंवा तहसिल कार्यालयाशी संपर्क साधून आपापल्या महाविद्यालयातील पात्र मतदारांची नाव नोंदणी 100 टक्के करुन घ्यावी, असे आवाहने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर तसेच उपजिल्हाधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड श्रीमती स्नेहा उबाळे यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक