एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प पेण अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न पारितोषिक वितरण कार्यक्रम दि.09 डिसेंबर 2022 रोजी

 


अलिबाग, दि.09 (जिमाका) :- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प पेण अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ कार्यक्रम दि.07 डिसेंबर 2022 रोजी शासकीय आश्रमशाळा सानेगाव ता.रोहा येथे संपन्न झाला.

 गुरुवार, दि.8 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी, खो-खो, धावणे, भालाफेक, गोळा फेक,थाळी फेक, लांब उडी, उंच उडी या पारंपारिक खेळाचा तसेच हॉलीबॉल, हँडबॉल, रीले या खेळांच्या स्पर्धा संपन्न झाल्या.

 या स्पर्धेमध्ये विजेत्या झालेल्या संघांची माहिती पुढीलप्रमाणे:- खेळाचा प्रकार- 14 वयोगटामध्ये कबड्डी मुलींचा संघ, विजेता संघ-शासकीय आश्रमशाळा नेरळ, उपविजेता संघ-शासकीय आश्रमशाळा भालीवडी.  17 वयोगटामध्ये कबड्डी मुलींचा संघ, विजेता संघ-शासकीय आश्रम शाळा रानपाखर, उपविजेता संघ-शासकीय आश्रमशाळा सानेगाव. 14 वयोगटामध्ये हॉलीबॉल मुलींचा संघ, विजेता संघ-शासकीय आश्रमशाळा माणगाववाडी उपविजेता संघ-शासकीय आश्रमशाळा साई.  17 वयोगटामध्ये हॉलीबॉल मुलींचा संघ, विजेता संघ-शासकीय आश्रमशाळ पिंगळस, उपविजेता संघ- शासकीय आश्रमशाळा कोळघर.  19 वयोगटामध्ये हँडबॉल मुलांचा संघ, विजेता संघ-शासकीय आश्रमशाळा भालीवडी, उपविजेतासंघ आश्रमशाळा पिंगळस.  14 वयोगटामध्ये खो-खो मुलांचा संघ,  विजेता संघ-शासकीय आश्रमशाळा पिंगळस, उपविजेता संघ- शासकीय आश्रमशाळा चिखले.  19 वयोगटामध्ये कबड्डी मुलांचा संघ, विजेता संघ-शासकीय आश्रमशाळा चिखले, उपविजेता संघ- शासकीय आश्रमशाळा सानेगाव.

 प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेतील उर्वरित अंतिम सामने, समारोप कार्यक्रम व विजेता संघांना पारितोषिक वितरण करण्याचा कार्यक्रम दि.09 डिसेंबर 2022 रोजी संपन्न होणार असल्याची माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अरुण पवार यांनी दिली आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक