खालापूर येथील विश्वनिकेतन महाविद्यालयात नव मतदार नोंदणी कार्यक्रम संपन्न

 

अलिबाग,दि.09(जिमाका):- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड-अलिबाग डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशान्वये व उपजिल्हा निवडणूक अधिकारी रायगड-अलिबाग श्रीमती स्नेहा उबाळे,  उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी 189 कर्जत विधानसभा मतदार संघ  अजित नैराळे यांच्या सूचनेप्रमाणे तसेच तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी खालापूर आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर येथील विश्वनिकेतन महाविद्यालय कुंभिवली व तहसिल कार्यालय खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी  दि.8 डिसेंबर2022 रोजी मतदार नोंदणी  शिबिर संपन्न झाले.

या कार्यक्रमासाठी तहसिल कार्यालय खालापूर येथील नायब तहसिलदार निवडणूक श्री.दशरथ भोईर, विश्वनिकेतन महाविद्यालयचे प्राचार्य श्री.पाटील, प्राध्यापक श्री.एच आर.मावकर, श्री निखिल कासार तसेच तलाठी श्री.सरगर हे उपस्थित होते.

नायब तहसिलदार श्री.दशरथ भोईर यांनी मतदार नोंदणी कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मतदानाचे महत्व, NVSP Portal व व्होटर हेल्पलाईन ॲपबाबत मागदर्शन करुन पात्र नवमतदारांची मतदार नोंदणी करण्याकामी अर्ज भरुन घेण्यात आले.

0000000

                                     

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक