राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रम संपन्न

दिनांक :- 15 नोव्हेंबर  2016                                                 वृत्त क्र. 723
राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रम संपन्न


अलिबाग,दि.15 (जिमाका) सदस्य सचिव,राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली  यांच्या पत्रानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे मार्गदर्शनानुसार 12 नोव्हेंबर 2016 रोजी जिल्हा न्यायालयात  राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
            या कार्यक्रमाचेवेळी दिवाणी न्यायाधीश व.स्तर अलिबाग तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग एल.डि.हुली,  मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड अलिबाग मु.गो.सेवलीकर आणि अन्य न्यायिक अधिकारी प्रविण एम.ठाकूर, अध्यक्ष वकिल संघटना अलिबाग व अन्य वकिल वर्ग उपस्थित होते.
राष्ट्रीय  लोकअदालतीमध्ये दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रकरणे, एन.आय.ॲक्‍ट,  मोटार अपघात प्रकरणे, कामगार न्यायालय अशी एकूण 1426 प्रकरणे आणि वादपूर्ण प्रकरणात एकूण 24934 प्रकरणे अशी एकूण 26360 प्रकरणे तडजोडीने सोडविण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. 
यामध्ये दिवाणी प्रकरणातील 271 प्रकरणांपैकी 39 निकाली, फौजदारी 370 पैकी 71 निकाली,एन.आय.ॲक्ट 257 पैकी 48 निकाली, मोटार  अपघात 251 पैकी 84 निकाली, कामगार न्यायालय 32 पैकी 03 निकाली  तर वादपूर्व प्रकरणांतील 24586 पैकी 348 निकाली काढण्यात आली आहेत.
तसेच मोटार अपघात प्रकारणांमध्ये रक्कम रुपये 2 कोटी 83 लाख 88 हजार 900/- इतकी नुकसान भरपाईची रक्कम मान्य करण्यात आली आणि वादपूर्व प्रकरणांमध्ये रक्कम रुपये 44 लाख 52 हजार 422/- इतकी रक्कम वसूल करण्यात आली असल्याचे सदस्य सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक