जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न

अलिबाग, दि.17 (जिमाका):- रायगड जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक दि.15 मार्च 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील रस्ते अपघातांची कारणे शोधणे व ती कमी करणे, ब्लॅक स्पॉट ची यादी तयार करणे व ब्लॅक स्पॉट कमी करण्याबाबत कारवाई करणे, जिल्ह्यातील रस्ते अपघातांच्या संख्येत वर नियंत्रण ठेवणे इत्यादी सह विविध विभागांनी केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने कामकाजाचा आढावा  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतला. होळी सणाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने कोकणवासीय कोकणात येतात,  त्यांना प्रवासामध्ये त्रास होऊ नये, यासाठी विविध विभागांनी समन्वय ठेवून तातडीने रस्ता दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी रस्त्यावरील सर्व प्रकारचे फलक व रस्त्यावरील रेषा या  रस्त्यावरील अपघात कमी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, याची दुरुस्ती व देखभाल  करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना दिल्या. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी  जिल्ह्यातील अपघातांचे विश्लेषण करणारे संगणकीय सादरीकरण केले. तसेच अपघात कमी करण्याबाबत दीर्घकालीन उपाय योजना व तातडीच्या उपाययोजना याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी या समितीचे सदस्य सचिव म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल श्री.अनिल पाटील व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण श्री.महेश देवकाते यांनी कामकाज पाहिले. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, पनवेल, जिल्हा वाहतूक शाखा, जिल्हा शल्य चिकित्सक, एसटी विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण-पनवेल यांचे अधिकारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक