जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांना ऑनलाईन रोजगार मेळाव्याकरिता रिक्त पदे अधिसूचित करण्याचे आवाहन


अलिबाग, दि.15 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत दि.17 ते 19 मार्च 2022 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाने ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

त्यासाठी या कार्यालयाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आस्थापनांनी या विभागाचे वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in वर प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती भरावी. ही माहिती भरताना प्रथम उपरोक्त वेबपोर्टलवरील Employment-Employer (List a Job) Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्हयाच्या नावावरील View Details Job Details Agree and Post Vacancy Add New Vacancy ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर रिक्तपदांची माहिती भरुन शेवटच्या पानावरील Save Vacancy वर क्लिक करावे. त्यानंतर Manage Jobs and Responses या ऑप्शनमधील माहिती भरून उमेदवारांची यादी प्राप्त करावी.

या यादीतील उमेदवारांना वेबपोर्टलद्वारे एसएमएस व पत्र पाठवून ऑनलाईन पध्दतीने व्हिडीओ कॉल इत्यादी माध्यमातून मुलाखतीची कार्यवाही पूर्ण करून उमेदवारांना कळविण्यात येईल. त्याचप्रमाणे ज्या आस्थापनांची यापूर्वी वरील वेबपोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली नाही त्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Employment Employer (List a Job) Register या क्रमाने जाऊन नवीन नोंदणी करावी व त्यांच्याकडील रिक्त पदे वरीलप्रमाणे वेबपोर्टलवर भरावीत.

नवीन नोंदणी करताना या वेबपोर्टलवरील Employment-Employer (List a Job) Register या ऑप्शन्सचा वापर करून आपल्या आस्थापनेची नोंदणी करावी. नवीन नोंदणी करताना आपले व्यवसाय सुरु करण्याबाबतचे प्रमाणपत्र (Incorporation Certificate) नोंदणीमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. संबंधित आस्थापनेची नवीन नोंदणी केल्यानंतर वरीलप्रमाणे आपल्याकडील रिक्त पदे अधिसूचित करुन वेबपोर्टलवरील पुढील कार्यवाही करावी. वेबपोर्टलवर नवीन नोंदणी करणे व पदे अधिसूचित करणे या संदर्भात काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा भ्रमणध्वनी क्र. 9820452264 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री.शा.गि.पवार यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक