जिल्ह्यातील हॉटेल्स, बेकरी, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी आणि भेळ विक्रेते व्यावसायिकांनी वृत्तपत्रात खाद्यपदार्थ न देण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन


अलिबाग, दि.17 (जिमाका):- जिल्ह्यातील हॉटेल्स, बेकरी, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी आणि भेळ विक्रेते व्यावसायिकांनी यापुढे ग्राहकांना अन्नपदार्थ वर्तमानपत्रामध्ये न देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायदा हा दि.05 ऑगस्ट 2011 पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला असून या कायद्याचा प्रमुख उद्देश मानवी सेवनास सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन देणे हा आहे. या कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबाजवणी करण्याचे कामकाज अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागामार्फत केले जाते.

वर्तमानपत्राच्या कागदामध्ये अन्नपदार्थ गुंडाळून/बांधून ग्राहकांना देण्याची प्रथा सर्रास दिसून येते. परंतू वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल / घातक रंग असल्याने गरम खाद्यपदार्थाच्या संपर्कात आल्यावर हे केमिकल विरघळते आणि ते आरोग्यास घातक असल्यामुळे अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठी करता येणार नाही. वर्तमानपत्र किंवा मासिकाचा कागद अधिक आकर्षित बनविण्यासाठी वापरले जाणारे घटक अधिक धोकादायक असतात. विशेषतः वयोवृध्द व लहान मुलांसाठी हे जास्त धोकादायक आहे.

तरी जिल्ह्यातील हॉटेल्स, बेकरी, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी आणि भेळ विक्रेते व्यावसायिकांनी यापुढे ग्राहकांना अन्नपदार्थ वर्तमानपत्रामध्ये न देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक