पत्रकारांसाठी आज कार्यशाळा मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 22/09/2016                                                                  वृ.क्र.620
पत्रकारांसाठी आज कार्यशाळा
मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन
      अलिबाग दि.22(जिमाका), भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालय मुंबईमार्फत व जिल्हा माहिती कार्यालय अलिबाग यांच्या सहयोगाने 23 सप्टेंबर 2016 रोजी अलिबाग जिल्हा रायगड येथे एकदिवसीय ग्रामीण प्रसारमाध्यम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या निती आणि विकासात्मक योजनांची माहिती लोकांपर्यंत सक्षमपणे पोहोचविणे, पत्र सूचना कार्यालयाची प्रादेशिक शाखा कार्यालये आणि जिल्हा तसेच उपजिल्हा स्तरावर कार्यरत पत्रकारांमध्ये थेट संवाद निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पत्र सूचना कार्यालयाची प्रसिध्दी पत्रके थेट त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने जिल्हा आणि उपजिल्हा स्तरावर कार्यरत पत्रकारांशी संपर्क विकसित करण्याच्या दृष्टीने पत्र सूचना कार्यालयाला अशा कार्यशाळा सहाय्यक ठरतील. यासाठीचे हे आयोजन आहे.

कार्यक्रम तपशिल
कार्यशाळेचा कार्यक्रम तपशिल पुढीलप्रमाणे आहे. पहिल्या सत्रात सकाळी 10.00 ते 10.30 वा. सहभाग नोंदणी, 10.30 वा. कार्यशाळेचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी रायगड श्रीमती शीतल      तेली-उगले यांच्याहस्ते  होईल. स्वागत व प्रास्ताविक पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे व जिल्हा माहिती अधिकारी करतील. त्यानंतर ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांचे बीजभाषण होईल. तसेच या कार्यशाळेत लोकमत कोकण समन्वयक जयंत धुळप-आपत्‍कालिन व्यवस्थापन आणि मिडीया तर संपादक कृषीवल प्रसाद केरकर-ग्रामीण भागात प्रभावी संपर्क साधणे यामध्ये  माध्यमांची भूमिका,   बँक ऑफ इंडिया अलिबाग अग्रणी बँक मॅनेजर टी. मधुसुधन-आर्थिक विकासात अग्रणी बँकेचे कार्य,  संपादक राम प्रहर मदन बडगुजर-ग्रामीण भागातील माध्यमांची भूमिका,  सहाय्यक संचालक नितीन सप्रे- पत्र सूचना कार्यालयामार्फत प्रभावी माहिती व ग्रामीण पत्रकारांची भूमिका, आणि  जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजु पाटोदकर- सोशल मिडीया आणि प्रसार माध्यम आदि विषयांवर मार्गदर्शन तथा चर्चा करतील.
हॉटेल मेपल आय.व्ही., गोंधळपाडा, अलिबाग येथे आयोजित केलेल्या या कार्यशाळेत स्थानिक जिल्हा, तालुका, गावपातळीवरील पत्रकारांनी  सहभागी व्हावे, असे आवाहन पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे व जिल्हा माहिती अधिकारी यांनी केले आहे.  

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक