रायगडसह इतर गड किल्ले सौंदर्यीकरण केंद्रीय पर्यटन मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा ---वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 22/09/2016                                                                   वृ.क्र.619
रायगडसह इतर गड किल्ले सौंदर्यीकरण
केंद्रीय पर्यटन मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा
                                         ---वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार

अलिबाग दि.22(जिमाका) रायगडसह महाराष्ट्रातील गड व किल्ले सौंदर्यीकरण दृष्टीने निधी बाबत  वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज नवी दिल्‍ली येथे केंद्रीय पर्यटन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री महेश शर्मा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेत केंद्रीय मंत्रीमहोदयांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्याची माहिती वित्तमंत्र्यांनी दिली.
महाराष्‍ट्रातील रायगड आणि सिंधुदुर्ग या किल्‍ल्‍यांचे नुतनीकरण व सौंदर्यीकरण तसेच पर्यटनाच्‍या दृष्‍टीने विकास करण्‍याबाबत आवश्‍यक उपाययोजना व सहकार्य करण्‍याची विनंती वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चेदरम्‍यान श्री. महेश शर्मा यांना केली. रायगड किल्‍ल्‍यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्‍यासंदर्भात महाराष्‍ट्र सरकारने संकल्‍पचित्र केंद्र सरकारकडे पाठविण्‍याबाबत लोकसभेत सांगण्‍यात आले होते, परंतु अद्याप राज्‍य सरकारतर्फे संकल्‍पचित्र केंद्रसरकारकडे पाठविण्‍यात आले नसल्‍याबाबत महेश शर्मा यांनी लक्ष वेधले असता वित्‍तमंत्र्यांनी तातडीने मुख्‍य सचिव स्‍वाधीन क्षत्रीय यांच्‍याशी दुरध्‍वनीद्वारे संपर्क साधून संकल्‍पचित्र केंद्र सरकारला पाठविण्‍याचे सांगितले.
तसेच चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक जटपुरा गेट चे सौंदर्यीकरण व प्रकाशयोजनेबाबत तसेच बल्‍लारपूर किल्‍ल्याचे सौंदर्यीकरण, नुतनीकरण व पर्यटनाच्‍या दृष्‍टीने विकास करण्‍याबाबतही  वित्‍तमंत्र्यांनी विनंती केली असता पुरातत्‍व विभागाच्‍या अधिका-यांचे पथक आढावा घेण्‍यास चंद्रपूर व बल्‍लारपूर येथे पाठविण्‍याचे आश्‍वासन महेश शर्मा यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे विदर्भाची काशी म्‍हणून ओखळल्‍या जाणा-या गडचिरोली जिल्हयातील श्री मार्कंडेश्‍वर मंदीराचा पर्यटन व तीर्थस्‍थळ म्‍हणून विकास करण्‍याबाबतही केंद्रीय मंत्री महोदयांचे लक्ष वेधले.
सेवाग्राम विकास आराखडा
राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांची 150 वी जयंती 2019 मध्‍ये साजरी होणार आहे. त्‍याअनुषंगाने सेवाग्राम विकास आराखडयासाठी निधी उपलब्‍ध होण्‍याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मा. पंतप्रधानाच्‍या अध्‍यक्षेखालील गांधी स्‍मृती दर्शन समिती अंतर्गत सेवाग्राम विकास आराखडयासाठी प्रस्‍तावित 266 कोटी रू. निधी पैकी दोन तृतीयांश निधी केंद्र सरकारने उपलब्‍ध करावा, अशी विनंती यावेळी वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करून सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन केंद्रीय मंत्री महोदयांनी दिले. यावेळी भारतीय पुरातत्‍व सर्व्‍हेक्षण विभागाचे अतिरिक्‍त महासंचालक शरद शर्मा यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
0000




Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक