जीवरक्षक साहित्याचे वाटप सागरी पर्यटक सुरक्षा संदर्भात जबाबदारीने काम करावे --जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले

दिनांक :- 20 सप्टेंबर  2016                                                      वृत्त क्र. 613

जीवरक्षक साहित्याचे वाटप
सागरी पर्यटक सुरक्षा संदर्भात
                जबाबदारीने काम करावे                                     
                                        --जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले



अलिबाग दि.20 (जिमाका) जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षा संदर्भात सर्व यंत्रणांनी तसेच सागरी किनाऱ्यावर नेमलेल्या सुरक्षा रक्षकांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे केले.  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक तथा जीवनरक्षक साहित्याचे वाटप संबंधितांना आज  करण्यात आले.  त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा परिषद रायगड उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, तहसिलदार अलिबाग प्रकाश संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर आदि उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या की, आपण जशी घराची स्वच्छता व देखभाल आपले घर आहे म्हणून करतो.  त्याचप्रकारे आपल्या भागात असलेला सागरी किनारा, आपले शहर, आपले गाव, आपला जिल्हा हे आपले घर आहे असे समजूनच त्याकडे लक्ष द्यावे. स्वच्छता राखावी.  पर्यटकाला या ठिकाणी वारंवार यावे असे वाटावे, त्यामुळे पर्यटकात वाढ होईल.  पर्यायाने  येथील पर्यटन व्यवसाय चांगला वाढेल, याकडेही संबंधितानी लक्ष द्यावे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत देण्यात आलेल्या 11 प्रकारच्या विविध साहित्यांची सुरक्षितता व देखभालही संबंधितानी    योग्यरितीने करावी, असेही त्यांनी सांगितले.  जवळपास 78 लाखांचे हे साहित्य असून जिल्ह्यातील 24 समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी याचा उपयोग केला जाणार आहे. 
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत पर्यटकांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी करावयाच्या उपायोजना संदर्भात जिल्हास्तरावर कार्यक्रम राबविण्यात आला असून यात प्राधाम्याने जीवरक्षकांची नेमणूक, त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील समुद्र किनारा बिचवर 25जीवरक्षक नेमण्यात आले आहेत.  प्राधिकरणामार्फत त्यांना मेगा फोन, दुर्बिण, टॉर्च, दोरखंड, लाइफ जॅकेट, फायबर स्ट्रेचर, स्कुबा ड्रायविंग सेट, जीव रक्षक रिंग, सायरन, उलन ब्लँकेंट, सर्च लाईट या साहित्याचे वाटप अलिबाग, मांडवा, आक्षी, नागाव, किहिम, रेवदंडा, कोर्ले, मुरुड-एकदरा, मुरुड-जंजिरा जलदुर्ग, काशीद, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, सासवणे, आवास,थळ, वरसोली, रांजणपाडा डावली, मिळकतखार, कोप्रेाली बोडणी, आदगाव,वेळास आगर,घारापुरी, नागाव पिरवाडा आदि ठिकाणांच्या सुरक्षेसाठी करण्यात आले, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.
या कार्यक्रमास संबंधित नगर परिषदेचे  मुख्याधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, लाईफ गार्ड उपस्थित होते.
000000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक