रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत मनाई आदेश जारी

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 22 सप्टेंबर  2016                                                          वृत्त क्र. 621
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत
 मनाई आदेश जारी
   अलिबाग दि.22 :- (जिमाका)  रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत (पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र वगळून) 22 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 8.00 पासून 5 ऑक्टोबर 2016 रात्रौ 12.00 वाजेपर्यंत कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस अधिसूचनेद्वारे मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
रायगड किल्ल्यावर दिनांक 24 सप्टेंबर 2016 रोजी आयोजित केलेल्या शिवराज्यभिषेक सोहळा व या सोहळयास काही संघटनानी दर्शविण्यात आलेला विरोध, 1 ऑक्टोबर 2016 पासून होत असलेला नवरात्रौ उत्सव, समाज कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे व इन्टीट्युट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरींग शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सुरु असलेले लेखणी बंद आंदोलन  या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)  (3) अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.
शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठया किंवा लाठ्या अगर शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही तत्सम वस्तू बाळगणे.  अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे.  दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे.  व्यक्ती,प्रेत, आकृत्या यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा देणे किंवा गाणे म्हणणे किंवा वाजविणे.  सभ्यता अगर निती या विरुध्द असतील अशी जिल्ह्याची शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्यशासन उलथून पाडण्याचा संभव आहे अशी आवेशपूर्ण भाषणे किंवा हावभाव करणे किंवा सोंग करणे, चित्र, चिन्हे अगर कोणतीही तत्सम वस्तू, जिन्नस तयार करणे किंवा लोकांत प्रसार करणे.   ज्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार किंवा  कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे अशा शासकीय  अधिकाऱ्यांना अशी हत्यारे योग्य रितीने बाळगण्यासाठी अगर ठेवून घेण्यासाठी लागू नाही.
पूर्व परवानगी  शिवाय पाच अगर पाचहून अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास किंवा मिरवणूकीस मनाई करण्यात आली आहे.  ही अधिसूचना खऱ्या प्रेतयात्रेसाठी, अंत्यविधीच्या जमावास अगर धार्मिक समारंभासाठी, शासकीय समारंभासाठी लागू नाही.
या कालावधीत होणारे उत्सव, सभा, मिरवणुका इत्यादी कार्यक्रमास परवानगी देण्याचे अधिकार अटींच्या अधिन राहून  संबधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक