रोहा येथे 18 रोजी 'विज्ञान एक्सप्रेस' 'जलवायु परिवर्तन' प्रदर्शन पाहण्याची जिल्हावासीयांना सुसंधी


        अलिबाग दि.15,(जिमाका):- भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा विशेष प्रकल्प असलेल्या ' विज्ञान एक्सप्रेस अर्थात सायन्स एक्सप्रेस मंगळवार दि.18 रोजी रोहा रेल्वेस्थानक येथे एक दिवसासाठी दाखल होत आहे. या वातानुकुलित गाडीत  जिल्हावासीयांना 'जलवायु परिवर्तन' या संकल्पनेवर आधारित  प्रदर्शन पाहण्याची संधी यनिमित्ताने उपलब्ध होत आहे. भारत सरकारच्या विज्ञन तंत्रज्ञान मंत्रालय, वन मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि जैव तंत्रज्ञान मंत्रालय यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.
 रोहा रेल्वे स्थानक येथे दि.18 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वा. दरम्यान हे  विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी उपलब्ध असेल. यावेळी  महाविद्यालयीन - शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी, नागरिक समाजातील सर्व घटकांसाठी हे प्रदर्शन पाहण्यासाठी  विनामुल्य खुले असेल, असे सायन्स एक्सप्रेसचे व्यवस्थापक नितीन तिवणे यांनी कळविले आहे.
काय आहे सायन्स एक्सप्रेस?
सायन्स एक्सप्रेस हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा (DST) विशेष प्रकल्पआहे. ही 16 डब्यांची वातानुकूलित प्रदर्शनी ट्रेन ऑक्टोबर 2007 पासून भारत भ्रमण करीत आहे. आतापर्यंत 01 लाख56हजार किमी चा प्रवास पूर्ण करणाऱ्या या गाडीने आठ वेळा देशाचा प्रवास पुर्ण केला आहे. देशभरातील 510 स्थानकांवर या गाडीने आपली उपस्थिती नोंदवली आहे. आत्तापर्यंतच्या 1750 प्रदर्शन दिवसांमध्ये या प्रदर्शनास अति प्रचंड असा 1.70 करोड दर्शकांचा प्रतिसाद लाभल्याने 'सायन्स एक्सप्रेस' हे सर्वात मोठे आणि सर्वाधिक दर्शक लाभलेले प्रदर्शन बनले असून त्यासाठी तब्बल 12 वेळा लिमका बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या विज्ञानाच्या राणीची दाखल घेतली गेली.
सायन्स एक्सप्रेस ने आपल्या पहिल्या चार पर्वा मध्ये जगभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतिची दखल घेतली. भारताततील समृद्ध जैवविविधतेचा मागोवा घेणारे प्रदर्शन त्या पुढील तीन पर्वामध्ये सायन्स एक्सप्रेस जैवविविधता विशेष या नावाने प्रदर्शित झाले. सायन्स एक्सप्रेस आठवे पर्व हे जागतिक तापमान वाढ आणि संबंधित आव्हानाना दर्शवणारे होते जे सायन्स एक्सप्रेस जलवायु परिवर्तन विशेष या नावाने प्रदर्शित केले गेले.
जलवायु परिवर्तन विशेष संकल्पनाः नववे पर्व
सध्याचे नववे पर्व हे 'जलवायु परिवर्तन विशेष' याच संकल्पनासाठीचे दुसरे वर्ष असून याचा शुभारंभ दि. 17 फेब्रुवारी 2017 रोजी दिल्ली येथील सफदेरजंग रेल्वेस्टेशनवर एका शानदार कार्यक्रमा द्वारे झाला. या सोहळ्यासाठी मा. केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. सुरेश प्रभू, मा. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, तसेच मा. केंद्रीय वने पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन मंत्री. कै. अनिल माधव दवे यांची उपस्थिती लाभली.
19 हजार किमी प्रवास आणि 68 स्थानकांवर मुक्काम
सध्याच्या पर्वा करिता भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्राद्यान विभाग (DST), वन, पर्यावरण आणि जलवायु परिवर्तन विभाग (MoEFCC), जैवतंत्रज्ञान विभाग, रेल्वे मंत्रालय, भारतीय वन्य जीव संस्था(WII) आणि विक्रम ए साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर या साऱ्यांनी मिळून अथक प्रयत्न केले आहेत. 19000 किमी चा प्रवास 17 फेब्रुवरी ते 08 सप्टेंबर या कालावधीत सायन्स एक्सप्रेस करणार असून 68 स्थानकांवर गाडीचा मुक्काम असेल.
जलवायु परिवर्तन समस्येबाबत जनजागृती
'जलवायु परिवर्तन' ही एक महत्त्वाची समस्या असून तिचे अनेक दीर्घकालीन तसेच लघुकालीन परिणाम आहेत. हवामाच्या रचनेत होणाऱ्या बदलांमुळे शेती उत्पादनवर होणारे परिणाम असोत वा समुद्राच्या स्तरात होणारी वाढ असो, जल वायु परिवर्तन ही आता गोर गरिबांवर भयावह परिणाम करू शकणारी जागतिक समस्या बनली आहे. पण तरीही जलवायु परिवर्तन आणि त्याचे परिणाम याबद्दल जन सामान्याना फारच थोडे ज्ञान आहे. तेव्हा जलवायु परिवर्तन बाबत जन जागृती करणारे हे प्रदर्शन म्हणजे चर्चा आणि मंथनाची सुसंधी म्हणावी लागेल.
4 नोव्हेंबर 2016 पासून पॅरिस कराराची अंबलबजावणी सुरू झाली आहे. जलवायु परिवर्तनाच्या धोक्यावर जागतिक पातळीवर सक्षम आणि परिणामकारक उपाय करणे आणि जलवायु परिवर्तन विरुद्धच्या लढ्यासाठी जागतिक प्रयत्नांना बळकटी प्राप्त करून देणे हे पॅरिस कराराचे मुख्य ध्येय आहे. COP 21 नंतर झालेली मिटिंग्स ऑफ द पार्टीस (COM 1) नोव्हें. 2016 मार्रकेश येथे आयोजित केली गेली. या चर्चासत्राने पॅरिस करारच्या अंबलबजावणीच्या मार्गाची आणि जलवायु परिवर्तनवर झालेल्या जागतिक बहुस्तरीय सहकार्यावर यशस्वी मोहर लावली.
'सायन्स एक्सप्रेस' ची पूर्वीची तीन पर्वे हे भारतीय जैव विविधते बाबत लोकांना सजग करण्याचा DST & MOEFCC चा एकत्रित प्रयास होता. त्यामुळेच भारतासह सार्‍या जगातील जैवविविधतेची हानी करणार्‍या जलवायु परिवर्तनाला अधोरेखित करणे महत्वाचे होते. त्यासाठी सायन्स एक्सप्रेस च कायापालट जलवायु परिवर्तन विशेष मध्ये केला गेला.  तेव्हा SECAS हे कल्पक प्रदर्शन जलवायू परिवर्तनाबद्दल समाजाच्या विविध स्तरामध्ये व्यापक जन जागृती करीत अनुकुलन आणि उपशमनच्या मार्गांची माहिती दर्शकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य करेल.
प्रत्येक कोचनिहाय प्रदर्शन रचना
SECAS च्या एकूण 16 डब्यांपैकी पहिल्या8 डब्यांमधील प्रदर्शनMOEFCCचे असून ते वातावरणीय बदलांची माहिती, प्रकरण अभ्यास आणी इतर विविध संसाधंनांनी भरलेले आहेत. त्याद्वारे वातावरणीय बदलांचे विज्ञान,परिणाम,अनुकूलन पद्धती, उपशमनचे मार्ग आणि धोरणांची माहिती केवळ शालेय विध्यर्थ्यांनाच नव्हे तर सर्व सामान्यांना सहज कळावी इतकी सुलभता राखली गेली आहे.तर इतर डब्यांमध्ये DBT तसेच DST चे प्रदर्शन आहे.
·         कोच नं. 1 :- वातावरणीय बदलांची संकल्पना – वातावरण प्रणाली चे ज्ञान, हरितगृह वायु परिणाम आणि वातावरणीय बदलांची कारणे दर्शवीत या मानव निर्मित बदलांचे ज्ञान दिले गेले आहे.
·         कोच नं. 2 :- वातावरणीय बदलांचे परिणाम – तापमान वाढ, अनियमित मान्सून, समुद्राची वाढती पातळी तसेच ह्या घटकांचे पाणी, शेती, वने, जैवविविधता आणि आरोग्यावर काय परिणाम घडतात याची माहिती दिली आहे.
·         कोच नं. 3 व 4 :- अनुकुलन–ही संकल्पना दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह दर्शवून ग्रामीण व शहरी जीवनासाठीच्या अनुकुलनपद्धती आणि भारत सरकारचे त्या साठीचे प्रयास दर्शविले गेले आहेत.
·         कोच नं. 5 व 6 :- उपशमन–या संकल्पनेची व्याख्या उदाहरणांसह देवून पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन पुनःप्रस्थापित करणे,कर्ब वायु शोषक वाढविणे आणि अक्षय ऊर्जेचा वापर करून हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणावर भर दिला गेला आहे. यासाठीचे भारत सरकारचे प्रयास आणि अक्षय ऊर्जेचे उत्पादन वाढविण्याची महत्वाकांशा दाखवली गेली आहे.
·         कोच नं. 7:- जलवायू परिवर्तन संदर्भातील आंतरराष्ट्रीय सहकार्य, United Nation Framework Convention on Climate Change (UNFCCC) आणि Inter governmental Panel on Climate Change (IPCC) तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अंगिकारलेली कृती व ध्येय यांची ओळख, समता या संकल्पनेची माहिती देवून क्योटो प्रोटोकॉल आणि Conference of Parties (COP) ची महत्वपूर्ण माहिती दिली गेली आहे.
·         कोच नं. 8 :- शाश्वत क्रिया (Handprint Actions)– आपल्याकडून शाळेत, रस्त्यावर, घरात आणि कार्यालयात आपेक्षित असलेल्या पर्यावरण स्नेही शाश्वत क्रिया दाखवून आपल्या जीवन पद्धतीत बदल करण्याचे अनेक पर्याय सादर करीत शाशवत क्रिया वाढवून हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचा संदेश दिलेला आहे.
·         कोच नं. 9 व 10 :- येथे जैव-संसाधने आणि निसर्ग संरक्षणासाठी जैव-तंत्रज्ञानाचा उपयोग दर्शवीत व्याघ्र-संरक्षण आणि Chemical Ecology ची माहिती दिली गेली आहे. जैव-तंत्रज्ञान या क्षेत्रात संशोधन आणि विकाससाठी भारत सरकारचा पुढाकार दाखवला गेला आहे. हे प्रदर्शन DBT द्वारे ठेवले गेले आहे.
·         कोच नं. 11 :- येथेNIF ने सामान्य माणसांची कल्पकता त्यांच्या नावीन्यपूर्ण शोधांच्या यशोगाथे द्वारे मांडली आहे. येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कल्पकता,वैज्ञानिक शिक्षण, तांत्रिक उपायोजना ई. माहिती दिली आहे.
·         कोच नं. 12 :- इयत्ता पाचवी आणि त्याखालील इयत्तांच्या लहान मुलांसाठी Kids Zone हा बाल कक्ष असून येथे लहान मुलांना गणित, विज्ञान, आणि पर्यावरण विषयक रंजक उपक्रम खेळ आणि कोडी दिली जातात.
·         कोच नं. 13 :- JoyofScience lab (JOS) या प्रयोगशाळेत इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थाना विज्ञानाचे प्रयोग जवळून अनुभवता आणि करता येतात. येथे गणित, विज्ञान, आणि पर्यावरणाच्या विविध संकल्पना रंजकतेने सांजवल्या जातात.
·         DST आणि CEL च्या सहकार्याने भारतातील अमाप सौर शक्तीचा उचित उपयोग करून घेण्यासाठी SECAS च्या अकरा ते तेरा या डब्यांच्या छतावर सौरघट बसवलेले आहेत.
आपल्या प्रत्येक मुक्कामावर SECAS विविध वयोगटातील दर्शकांपर्यंत आपला संदेश व्यवस्थित पोहचविण्यासाठी अनेक उपक्रम आयोजित करीत असते. रेल्वेस्थानकांतील PlatformActivities आणि स्थानिक शाळा आणि संस्थांमध्ये जावून तेथे केले जाणारे outreach programmes हि त्याचीच उदाहरणे. शाळा आणि दर्शकांपर्यंत ही सारी माहिती व्यवस्थित पोहचवण्यासाठी विविध माहिती पत्रके उपलब्ध केली जातात.
SECAS चे व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी DST ने VASCSC, Ahmedabad या संस्थेवर सोपवली आहे. VASCSC चे प्रशिक्षित आणि उत्साही विज्ञान संवादक (Science Communicator) ट्रेनसोबत देशभरचा प्रवास करून अथकपणे दर्शकांसाठी प्रदर्शन समजावणे, शंका समाधान करणे, मार्ग दर्शन करणे तसेच इतर पूरक कामे व्यवस्थित करतात.
मुख्यतः विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी बनवले गेलेले हे प्रदर्शन जंनसामान्यांसाठीही खुले आहे. प्रदर्शनाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी www.sciencexpress.in या संकेतस्थळावर भेट देता येईल.
प्रदर्शन पाहण्यासाठी तसेच चौकशीसाठी sciencexpress@gmail.com वर ई-मेल पाठवता येईल. संपर्कासाठी 09428405407 या मोबाइल क्रमांकावर संपर्क करता येईल.
            Joy of Science lab (JOS) याप्रयोगशाळेत आगावू नोंदणी केल्यास जास्तीत जास्त 20 विद्यार्थ्यांच्या तुकडीला प्रवेश दिला जातो.
या संधीचा लाभ घेऊन जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी , महाविद्यालयीन ,शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन  सायन्स एक्सप्रेसचे व्यवस्थापक नितीन तिवने यांनी केले आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक