जीएसटी करप्रणाली अंमलबजावणी अपर मुख्य सचिव बिपीन मलिक यांनी घेतला जिल्ह्यातील स्थितीचा आढावा


अलिबाग,दि.11- जीएसटी कर अर्थात वस्तु व सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी होत असतांना ग्राहकहिताला कोणतीही बाधा येऊ न देता दर आकारणी करावी. यासंदर्भात व्यापारी वर्गाने येणाऱ्या अडचणींबाबत योग्य त्या सुचना कराव्या. योग्य सुचनांची दखल घेतली जाईल, अशा शब्दात केंद्रीय अपर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे वस्तु सेवा कर निरीक्षक बिपीन मलिक यांनी  व्यापारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले.
जीएसटी करप्रणालीच्या अंमलबजावणी नंतर व्यापारी, ग्राहक तसेच अन्य क्षेत्रात निर्माण होत असलेल्या परिस्थितीचा श्री. मलिक यांनी आज आढावा घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आज सकाळी ही बैठक पार पडली. या बैठकीस फरहा जाकीरहा, असिस्टंट कमिशनर जीएसटी, जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, श्रीम.सु.स.थोरात, कर उपआयुक्त (राज्य) कोकण भवन, नवी मुंबई, अशोक नंदनवार, अग्रणी जिल्हा प्रबंध रायगड गि.दि.हुकरे, सहा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन सुबोध लवटे, स्टेट टॅक्स ऑफिसर एस.एस.कदम, सहा.कंट्रोलर लिगल मेट्रॉलॉजी रायगड तसेच इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री.मलिक यांनी व्यापारी वर्गाला जीएसटी संदर्भात मार्गदर्शन केले व त्या संबंधातील त्यांच्या समस्या जाणून घेऊन जीएसटीमुळे व्यापारी वर्गाने ग्राहकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगितले.  या बैठकीस रायगड जिल्ह्यातील मॅन्युफॅक्चरींग असोसिएशन, व्यापारी संघटना युनियन अध्यक्ष, हॉटेल संघटना अध्यक्ष, पेट्रोल पंप व्यवस्थापक, किराणा व्यापारी अध्यक्ष उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक