माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती व विद्यावेतन


अलिबाग दि.12,(जिमाका) :- माजी सैनिक / विधवांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक वर्ष सन  2017-18 साठी शिष्यवृत्ती व विद्यावेतन देण्यात येणार आहे. त्यात इयत्ता 10 वी 12 वी तसेच पदवी, पदवीका परिक्षेत किमान 60% गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व पुढील शिक्षण घेणाऱ्या तसेच विद्यापीठाने मान्य केलेल्या विषयांमध्ये संशोधनपर अभ्यासक्रम करणाऱ्या (पीएचडी व तत्सम) पाल्यांचा समावेश आहे.  अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दर वर्षी शैक्षणिक शिष्यवृती देण्यात येणार आहे. याकरीता माजी सैनिक ,विधवांनी वैयक्तिक अर्ज, डी.डी.-40 फॉर्म (कार्यालयात उपलब्ध् आहे.),ओळखपत्राची पाठपोट छायांकित प्रत,सध्या पाल्य ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्गाचे बोनाफाईड सर्टिफिकेट., उत्तीर्ण झालेल्या वर्गाच्या गुणपत्रीकेची प्रमाणित सत्यप्रत., डिस्चार्ज पुस्तकातील कुटूंबातील सदस्यांची नावे असलेल्या पानाची छायांकित प्रत., इतर कुठलीही शिष्यवृत्ती मिळत नसलेबाबतचा कॉलेजचा दाखला या कागदपत्रांसह दि. 15 ऑक्टोबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड अलिबाग या कार्यालयात अर्ज करावा व लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त्‍) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड अलिबाग यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड