जागतिक युवा कौशल्य दिन कौशल्य प्रशिक्षण संस्थांचा गौरव


            अलिबाग, दि.15 (जिमाका)-  जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पनवेल येथे आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या उत्कृष्ट संस्थांचा गौरव करण्यात आला.
          जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयातर्फे पेस स्कील ट्रेनिंग सेंटर, सांगुर्ली, ता.पनवेल, जिल्हा-रायगड येथे जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला.         अध्यक्षस्थानी  एल. अँड टी. बांधकाम कौशल्य विकास केंद्र, भोकरपाडा, पनवेल येथील प्राचार्य,तेजेराव पाटील,  हे होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कौशल्य प्रशिक्षणाचे महत्व विषद केले.  यावेळी जिल्हयातील खाजगी कौशल्य   प्रशिक्षण संस्थांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी योजनेचे उत्कृष्ठ काम करणाऱ्या व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्थांना पारितोषिक वितरण करुन गौरविण्यात आले. त्यामध्ये  एल. अँड टी. बांधकाम कौशल्य विकास केंद्र, भोकरपाडा, पनवेल  या संस्थेस प्रथम पारितोषिक, पेस स्कील ट्रेनिंग सेंटर, सांगुर्ली, ता.पनवेल या संस्थेस द्वितीय पारितोषिक आणि डॉन बास्को युवा संस्था, मोठे वेणगाव, ता.कर्जत, जिल्हा-रायगड या संस्थेस तृतीय पारितोषिक ट्रॉफी व प्रमाणपत्र वितरण करुन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे पिल्लई स्कील डीव्हलपमेंट इन्स्टीटयुट, रसायनी-पनवेल या कौशल्य   प्रशिक्षण संस्थेस उत्तेजनार्थ पारितोषिक प्रमाणपत्र वितरण करुन गौरविण्यात आले.
         या कार्यक्रमास सहाय्यक संचालक,  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग शा.गि.पवार, व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्थांचे प्रतिनिधी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात एकूण 12 कौशल्य प्रशिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, 100 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. 

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक