महाड येथील सैनिकी मुलांचे वसतीगृह प्रवेश

महाड येथील सैनिकी
मुलांचे वसतीगृह प्रवेश

अलिबाग,दि.03 (जिमाका):- सैनिकी मुलांचे वसतीगृह, नवेनगर,महाड येथे शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी प्रवेश प्रक्रीया सुरु असून संबंधितांनी विहीत नमुन्यातील अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
या वसतीगृहात आजी,माजी सैनिक,विधवा व इतर नागरिकांचे पाल्याकरिता अतिअल्प भोजन शुल्क आकारुन इयत्ता 9वी पासून पदविका,पदवी पर्यंत शिकणाऱ्या मुलांना प्रवेश देण्याची प्रक्रीया सुरु झालेली आहे. या शिस्तबद्ध सैनिकी वसतीगृहात  प्रवेश घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज मुलांचे वसतिगृह, नवेनगर,महाड येथे वसतीगृह अधिक्षक यांच्याकडे उपलब्ध आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण व इतर दुर्गम भागात वास्त्व करणाऱ्या आजी,माजी सैनिक व इतर नागरिकांच्या पाल्यांना या सैनिकी वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यात येईल.
या वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2017 आहे. अधिक माहितीसाठी 02145-225451 व 02141-222208 या दुरध्वनी क्रमांकावर व 8857012683 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन मेजर प्रांजल जाधव(निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड