खेळाडूंना आर्थिक सहाय प्रस्ताव सादर करावेत

खेळाडूंना आर्थिक सहाय
प्रस्ताव सादर करावेत
अलिबाग,दि.03 (जिमाका):-राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परीणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते  खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभूत सुविधा, खेळाडुंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख या बाबी विचारात घेवून क्रीडा धोरण  तयार करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य ही योजना संचालनालय स्तरावर कार्यान्वित आहे.
ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चॅपियनशिप, युथ ऑलिंपिक, ज्यु विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई जागतिक स्पर्धा,पॅरा ऑलिंपिक स्पर्धा,पॅरा एशियन स्पर्धा,ज्युनिअर एशियन चॅपियनशिप,एशियन कप,वर्ल्ड कप. या चौदा अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना पुढील बाबीसाठी अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवास खर्च,प्रवेश शुल्क, निवास भोजन इ.देशविदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे,तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क,प्रशिक्षण कार्यक्रम  शुल्क. आधुनिक क्रीडा साहित्य आयात, खरेदी करणे,गणवेश आदींचा समावेश या योजनेत आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्या खेळ,क्रीडा प्रकारांचा समावेश असेल तेच खेळ,क्रीडा प्रकार वरील नमूद इतर स्पर्धांमध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय होतील. मात्र अपवाद कबड्डी, खो-खो, मल्लखांब या देशी खेळांचा अपवाद शासन निर्णयान्वये करण्यात आलेला आहे.
या विविध अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा सहभागी झालेल्या खेळाडूंना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन आवश्यक कागदपत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,रायगड किंवा आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे तात्काळ सादर करावेत. अर्ज व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालय,रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

000000000000 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक