पनवेल व पाली सुधागड मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह 2017-18 शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश

पनवेल व पाली सुधागड मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह
2017-18 शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश
अलिबाग,दि.31:-(जिमाका)-सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थींनींकरीता मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह,सेक्टर-10,प्लॉट नं.21,ग्रीन पार्क सोसायटी समोर,पनवेल तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह,पाली सुधागड,मधली आळी,राम मंदीर रोड,तळ्याच्या शेजारी, पाली सुधागड या शासकीय वसतीगृहात गरीब,  हुशार,  होतकरु,  मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थींनींना (अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग,आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व अपंग ) गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. त्यासाठी संबंधित इच्छुकांनी संपर्क साधावा. असे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
वसतीगृहात विद्यार्थ्यांना निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य आहे. भोजन व्यवस्थेमध्ये पोटभर जेवण, देण्यात येते. यात डाळ, भात, चपाती, भाजी, उसळ,लोणी,पापड,तूप इ.सह आठवड्यातून दोन वेळा चिकण,मटण,नाष्टा- पोहे,शिरा,उपीट इ.पैकी एक  व उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतुमानानुसार एक फळ व शर्करायुक्त दुध आदींचा समावेश असतो.
            तसेच अभ्यासाकरीता लागणारी वह्या,पुस्तके,शैक्षणिक व लेखन साहित्य विनामूल्य पुरविले जाते. भत्ता दिला जातो. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रु.600/- निर्वाहभत्ता दिला जातो. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थींनींना गणवेशाचे दोन संचाकरिता गणवेश भत्ता दिला जातो.
प्रवेशासाठी अटी
            प्रवेशपात्र विद्यार्थींनींच्या पालकांचे सर्व मार्गानी मिळून वार्षिक उत्पन्न अनु. जाती, विद्यार्थींनींकरिता रु.2 लाख  चे आत व विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासवर्गीय,विशेष मागास प्रवर्ग,आर्थिकदृष्ट्या मागास,अनाथ व अपंग घटकातील विद्यार्थींनींकरिता रु.1 लाख चे आत असावे.अर्जासोबत तहसिलदार यांचे सहिचा सन 2017-18 मधील उत्पन्नाचा दाखला व जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र व मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक जोडणे आवश्यक आहे.
            ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी www.mahaeshol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर  भरावेत.
            अधिक माहितीकरिता गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह यांचेशी वरील पत्त्यावर संपर्क साधावा. असे आवाहन केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक