कोळंबी बीज उत्पादन केंद्र योजनेचा लाभ घेण्याकरीता संपर्क साधावा



अलिबाग, जि. रायगड, दि.21 (जिमाका)- महाराष्ट्र राज्यामध्ये कोकण विभागातील सात जिल्हयामध्ये दोन मोठे कोळंबी बीज उत्पादन केंद्र वाषिर्क 200.00 दशलक्ष पोस्ट लार्व्हा क्षमता असलेले (ठाणे-पालघर रायगड जिल्हयाकरीता एक रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्हयासाठी एक) भांडवली खर्च रू. 460.00 लक्ष प्रती कोळंबी बीज उत्पादन केंद्र किमतीच्या 25 टक्के अनूदानासहीत तसेच पाच छोटे कोळंबी बीज उत्पादन केंद्र, 50.00 लक्ष पोस्ट लार्व्हा क्षमता असलेले (ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्हयासाठी प्रती जिल्हा एक) भांडवली खर्च रू. 50.00 लक्ष प्रती कोळंबी बीज उत्पादन केंद्र किमतीच्या 50 टक्के अनुदानासह खाजगी व्यक्ती, संस्था कंपनी यांना वर नमूद केलेल्या अनुदानासह देण्याबाबत शासनाने कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मत्स्यव्यवसाय विभाग, शासन निर्णय क्रमांक मत्स्यवि 2017/प्र.क्र.76/पदुम-12, दि. 28 मार्च 2018 रोजी निर्गमित केला आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता जिहयातील इच्छुक व्यक्ती, संस्था कंपनी यांना यांचे स्वयंस्पष्ट प्रस्ताव डी.पी.आर. सह कार्यालयीन वेळेत सादर करावेत, प्रकल्पाकरीता आवश्यक अटी शर्ती इतर आवश्यक माहिती वर नमुद केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे राहिल. अधिक माहितीसाठी प्र सहाय्यक आयूक्त मत्स्यव्यवसाय, रायगड-अलिबाग र. प्र. राजम, श्री सिद्धी अपार्टमेंट, तिसरा मजला, डॉ. पुष्पलता शिंदे हॉस्पिटलच्या समोर, अलिबाग पेण रोड. (दूरध्वनी क्रमांक- 02141-224221) यांच्याशी संपर्क साधावा.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक