जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2019-2020




            अलिबाग दि.21, क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगडद्वारा जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडापटू (1 महिला, 1 पुरुष, 1 दिव्यांग खेळाडू) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक 1 व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता 1  यांच्या कार्याचे/ योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2002 पासून देण्यात येतो, जिल्यातील उत्कृष्ट खेळाडॅ मार्गदर्शक व क्रीडा संघटक/ कार्यकर्ता यांना हा पुरस्कार 26 जानेवारी 2020 रोजी देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सन 2019-20 च्या पुरस्कार वितरणासाठी या कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पुरस्कारा मध्ये प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रु.10,000/- असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारा करिता 1 जुलै 2014 ते 30 जून 2019 पर्यतची कामगिरी/ कार्य ग्राह्य धरले जाईल.
पुरस्काराचे थोडक्यात निकष खालील प्रमाणे आहेत.
1) गुणवंत खेळाडू :- या पुरस्कारा अंतर्गत तीन पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून एक महिला खेळाडू, एक पुरुष खेळाडू व एक दिव्यांग खेळाडू यांना सदरचा पुरस्कार देण्यात येणार आहे. 1) संबंधित जिल्हयामध्ये खेळाडूने लगत पूर्व 5 वर्षा पैकी 2 वर्ष त्या जिल्हयाचे मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व केले असले पाहिजे 2) खेळाडूंची मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य/राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धामधील पुरस्कार वर्षाच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ/ कनिष्ठ शालेय ग्रामीण व महिला (पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान) मधील राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी लक्षात घेण्यात येईल. यापैकी उत्कृष्ठ ठरणाऱ्या तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल. 3) खेळाडू त्याचा अर्ज विहित नमुन्यात व विहित मुदतीत या कार्यालयात सादर करावा. 4) खेळाडूने स्पर्धांच्या मुळ प्रमाणपत्रांच्या स्वाक्षांकित प्रती सोबत सादर करणे आवश्यक राहील. 5) खेळाडूंचा अर्ज अधिकृत जिल्हा संघटने मार्फत शिफारास करुन सादर करणे आवश्यक राहील तथापि अपवादात्मक परिस्थितीत खेळाडू वैयक्तिक रित्या अर्ज करु शकतील 6) पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य असले पाहिजे.
2) क्रीडामार्गदर्शक :- 1) पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षवास्तव्य असले पाहिजे 2) संबंधित जिल्हयात अ) क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्ष क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले पाहिजे व त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकना करिता त्या जिल्हयातील खेळाडूंची कामगिरी ग्राहय धरली जाईल. 3) एका जिल्हयामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्यात पात्र राहणार नाही. 4) एकदा एका खेळामध्ये किंवा एका प्रवर्गामध्ये जिल्हा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्काराकरीता अर्ज करण्यास पात्र असणार नाही.
3) गुणवंत संघटक :- 1) पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्त्‍व्य असले पाहिजे 2) क्रीडा संघटक/कार्यकर्त्याने सतत दहा वर्ष महाराष्ट्रात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहीजे व त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकना करीता त्या जिल्हयातील कामगिरी ग्राहय धरली जाईल.
            जिल्हा क्रीडा पुरस्कार 2019 करीता मुदतवाढ देण्यात आली असुन विहित नमुन्यातील अर्ज, पुरस्काराच्या अटी व शर्ती इतर माहितीसाठी इच्छुकांनी व्यक्तिश: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड येथे कार्यालयीन वेळेत अर्ज प्राप्त करुन घेऊन सदरचे परिपूर्ण अर्ज दि. 10/01/2020 पर्यंत या कार्यालयात सादर करावेत. मुदती नंतर येणारे अर्ज स्विकारण्यात येणार नाही, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, यांनी केले आहे.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक