उद्योग/व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळण्याकरिता इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

 

 

अलिबाग,दि.१० (जिमाका) :- शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मिनी मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मदारी, मादगी या १२ पोट जातीतील समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता, स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग/व्यवसाय करण्यासाठी महामंडळाच्या २० कलमी कार्यक्रम २००६ कलम १० (३४) अ नुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा कार्यालय रायगड-अलिबाग करिता अनुदान योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट २५, बीजभांडवल योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट २० प्राप्त असून अर्ज मागविण्यात येत आहेत.

              यासाठी अर्जदार मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील असावा, अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा,  अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे, अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.३ लाखापेक्षा जास्त नसावे, एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल, अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षित असावा, अर्जदारास महामंडळाचे प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र/करारपत्रे/कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

              अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, रायगड-अलिबाग, श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या., सदनिका क्र.२. तळमजला, मारुती मंदिराच्या मागे चेंढरे, पो.ता.अलिबाग, जि.रायगड- ४०२२०१ या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अंगद लिंबाजी कांबळे यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक