चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक नोंदणीकरिता आगाऊ अर्ज स्विकारणे व लिलाव कार्यपद्धती सुरु


 

अलिबाग,दि.८(जिमाका):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी दिनांक ११ मे २०२३ रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी १०.३० ते दुपारी ०२.३० या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात डीडी, पत्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा.

एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि. ११ मे २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि. १२ मे  २०२३ रोजी कार्यालयीन वेळेत दुपारी २.३० वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रक्कमेचा डीडी बंद लिफाफ्यामध्ये कार्यालयात जमा करावा अतिरीक्त धनाकर्षण कमीत कमी ३०१ रु. चा असावा त्यापेक्षा कमी रकमेच्या धनाकर्षणचा विचार केला जाणार नाही. सदर अर्जासाठी त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या दालनात लिलाव करण्यात येईल.

 सदर डीडी Dy. RTO PEN यांच्या नांवे नॅशनलाईज्ड / शेड्युल्ड बँकेचा असावा तसेच तो दोन महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा. अर्जादाराने अर्जासोबत पॅनकार्ड व आधारकार्ड साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. लिलावाकरिता जमा करण्यात येणारा डीडी (फक्त एकच डीडी) या सीलबंद पाकीटात जमा करावा, आकर्षक क्रमांकासाठी आलेल्या अर्जासोबत असणारे धनाकर्षण अर्ज स्विकारणाऱ्या दिवसापासून दोन महिन्यापेक्षा जुने असलेले धनाकर्षणाचे अर्ज बाद केले जातील. तसेच विहित शुल्कापेक्षा कमी रक्कमेचे असलेले डीडी सुद्धा बाद केले जातील. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.आकर्षक क्रमांकासाठी आगाऊ स्वरुपात अर्ज स्विकारत असून चालू मालिका संपल्याशिवाय नवीन मालिका सुरु होणार नाही. तसेच आगाऊ प्रक्रियेमध्ये स्विकारलेल्या अर्जाच्या धनाकर्षण च्या पावत्या, जुन्या मालिकेतील पूर्ण नंबर संपल्याशिवाय फाडल्या जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी.

नवीन चारचाकी मालिकेचे वेळापत्रक : दि. ११ मे २०२३ नियमित शुल्कासहीत अर्ज स्विकारणे,दि. १२ मे २०२३ एका नंबरसाठी एकापेक्षा जास्त आलेल्या अर्जांचा लिलाव, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, महेश देवकाते यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक