मराठा, कुणबी समाजासाठी काम करणाऱ्या "सारथी" संस्थेचे मुंबई विभागीय कार्यालय खारघर येथे सुरु



 

अलिबाग,दि.12 (जिमाका):- राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. संस्थेच्या मुंबई विभागीय कार्यालयांतर्गत ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याचे कार्यक्षेत्र आहे. हे मुंबई विभागीय कार्यालय एमटीएनएल इमारत, रेनट्री मार्ग, सेक्टर 21, खारघर ता.पनवेल, जि.रायगड येथे सुरु करण्यात आले आहे.  या कार्यालयाचा ई-मेल आयडी sarthikharghar@gmail.com, असून Website https://sarthi-maharashtragiv.in/en, ही आहे.

               रायगड जिल्ह्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील समाज बांधवांनी विभागीय कार्यालयास भेट द्यावी व सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन  मुंबई विभागीय कार्यालयाचे प्रमुख व सारथी संस्थेचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी श्री.संदिप पवार यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक