पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारातील विद्यार्थी व इतर कर्मचाऱ्यांसाठी उपहारगृह चालविणाऱ्या इच्छुक व्यक्ती/संस्थांनी निविदा सादर कराव्यात

 


          अलिबाग,दि.8(जिमाका):- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल या शासकीय शैक्षणिक संस्थेच्या आवारात एकूण पाच इमारती असून दीड हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्याना येथे व्यवसाय शिक्षण दिले जाते. त्याकरिता उपलब्ध असलेला शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग जवळपास 200 च्या आसपास आहे. या प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जेवण व अल्पोपहार तसेच इतर खादय पदार्थ स्वच्छ व स्वस्त दरात संस्थेच्या आवारात उपलब्ध करुन दयायचे असल्याने शासनाने घालून दिलेल्या खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून महिला  गटाच्या आहार व्यवस्थापक ठेकेदारास " ज्यांना महाराष्ट्रीयन पध्दतीचे जेवण, अल्पोपहार, चहा, कॉफी इ. खादय पदार्थ उत्तमरित्या पुरविण्याचे व शासकीय खाजगी उपहारगृह अथवा  फिरते उपहारगृह (Mobile Canteen) चालविण्याचा अनुभव आहे. त्यांच्याकरिता संबंधित अटी व शर्ती, निविदा सूचना, विहित निविदा नमुना व महत्वाच्या इतर सूचना या संस्थेत उपलब्ध करण्यात आलेल्या असून त्याच्या छापील प्रतींची किंमत रुपये 200/- अशी आहे.

   निविदे प्रक्रियेबद्दल अन्य काही महत्वाच्या अटी- करारपत्र 11 महिन्यांकरिता (Leave Licence ) पध्दतीने करण्यात येईल, करारनामा हा (Legal vetted) कायदेशीर असेल, जागेचे भाडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त होईल त्या दरानुसार आकारण्यात येईल, वीज देयक/पाणी देयक स्वतंत्ररित्या आकारण्यात येईल.

    तरी इच्छुकांनी आपल्या सिलबंद निविदा विहित नमुन्यात दि.19 मे 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत या संस्थेत सादर कराव्यात, असे आवाहन पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नि.के.चौधरी  यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक