अलिबाग जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन सर्वसामान्य रुग्णांसाठी कार्यान्वित

 

अलिबाग,दि.११ (जिमाका) :- जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे क्ष-किरण विभागातील सिटीस्कॅन मशीन दि.५ मे २०२३ पासून तांत्रि‍क बिघाडामुळे बंद होती. या मशिनची दुरुस्ती करण्यात आली असून यासाठी रुपये ४ लाख खर्च आला आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक,डॉ.सुहास माने व क्ष-किरण विभागातील तांत्रिक कर्मचारी श्री.तरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून सद्य:स्थितीत अलिबाग जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन सर्वसामान्य रुग्ण, दारिद्रय रेषेखालील, अपंग व गरीब आणि इतर रुग्णांसाठी कार्यान्वित केली आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक