गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी रायगड येथे कार्यालय कार्यान्वित


 

रायगड दि.15(जिमाका):-महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत गुरव समाजाच्या सर्वांगीण विकास व आर्थिक उन्नतीसाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि विरशैव लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची शासनाने स्थापना केली असून गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी रायगड येथे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजातील नागरिकांनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या., श्री राम समर्थ सहकारी गृहसंस्था मर्या., रुम नं. 101, पहिला मजलाचेंढरेहनुमान मंदिराच्या मागेताअलिबागजि.रायगड,  (संपर्कासाठी दुरध्वनी क्र. 02141-224448) येथे संपर्क साधावा.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक