गेल कंपनी उसर कंपनीकडून सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता वाहतूक बंदी अधिसूचना जारी

 

 

रायगड दि.14(जिमाका) :- गेल कंपनी उसर, ता.अलिबाग या कंपनीकडून कुरुळ ते उसर अशी सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता कुरुळ ते उसर कंपनीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक दि.15 डिसेंबर 2023 व दि.19 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 03.00 ते 10 वाजेपर्यंत बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ.योगशे म्हसे यांनी  जारी केली आहे.

यावेळी पर्यायी मार्ग म्हणून रोहा ते अलिबाग बाजूकडे येणाऱ्या सर्व वाहनांना वावेफाटा-चौलनाका-नागाव-आक्षी मार्गे बेलकडे फाटा ते अलिबाग मार्ग तसेच अलिबाग ते रोहा बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना अलिबाग-बेलकडे फाटा-आक्षी-नागाव-चौलनाका- वावेफाटा मार्गे रोहा असे पर्यायी मार्ग आहेत.

भारत सरकारच्या गेल कंपनी उसर, ता.अलिबाग या कंपनीकडून कुरूळ ते उसर अशी सेल (CARGO) चर्चा वाहतूक करण्याचे काम Total Movements Pvt. Ltd या कंपनीला मिळालेले आहे. या सेलची रूंदी 6.53 मिटर व उंची 10 मिटर आहे. अलिबाग रोहा रस्ता रा.प.म.91 किलोमिटर 2/200 ते 14/00 दरम्यान उसर येथील गेल कंपनीपर्यंत या सेलची वाहतुक ही दि.07 डिसेंबर 2023 रोजी पासून पुढील 03 टप्यामध्ये वेगवेगळ्या तारखेस होणार होतीत्यापैकी एक टप्पा हा दि.07 डिसेंबर 2023 रोजी पूर्ण करण्यात आला आहे. या सेल (CARGO) ची रूंदी व उंची जास्त असल्याकारणाने वाहतुकीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता एम.एस.इ.बी., सार्वजनिक बांधकाम खाते, वनखाते यांच्याकडून योग्य तो उपाययोजना करण्यात येणार असल्याबाबतचे पत्र Total Movements Pvt. Ltd या कंपनीने प्राप्त करुन घेतले आहे.

ही वाहतुक करतेवेळी वाहतूक कोंडी निर्माण होणार असल्याने वाहन चालक व नागरीकांना वाहतूक कोंडीचा त्रास होवू नये म्हणून उपाय योजनेच्या दृष्टिकोनातून ही वाहतूक ही रात्री 12.00 नंतर करण्याचे ठरविले होते. परंतु एम.एस.इ.बी. ला तांत्रिक अडचण येत असल्याकारणाने ही वाहतूक पहाटेच्या वेळी सुरू करण्याचे नियोजिले आहे. त्यामुळे उर्वरित दोन टप्प्यांची वाहतूक ही वाहतुक दि.15 डिसेंबर 2023  व दि.19 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 03.00 ते 10 वाजेपर्यंतच्या कालावधीत करण्याचे निश्चित करण्यात आले असल्याने यावेळी पर्यायी मार्ग म्हणून रोहा त अलिबाग बाजूकडे येणाऱ्या सर्व वाहनांना वावेफाटा-चौलनाका-नागाव-आक्षी मार्गे बेलकडे फाटा ते अलिबाग तसेच अलिबाग ते रोहा बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना अलिबाग-बेलकडे फाटा-आक्षी-नागाव-चौलनाका- वावेफाटा मार्गे रोहा असे पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. परंतु कुरूळ ते बेलकडे फाटा या मार्गावरून कॅनव्हाय जाईपर्यंत पर्यायी मार्ग नसल्याकारणाने सदर वेळी वाहतूक ही पूर्णपणे बंद राहणार आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक