जागतिक एड्स दिन व पंधरवडानिमित्त आयोजित जिल्हा प्रश्न मंजुषा स्पर्धा संपन्न

 


रायगड दि.14(जिमाका) :-जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांच्यामार्फत  जागतिक एड्स दिन व पंधरवडा निमित्त  जिल्हा प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत यामध्ये कु.स्नेहल सचिन जाधव, इयत्ता  9 वी, (के.एस.ओ.अलिबाग) या विद्यर्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

     या  जिल्हा  प्रश्न मंजुषा स्पर्धेत 19 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.  या स्पर्धाचा निकाल पुढीलप्रमाणे कु.स्नेहल सचिन जाधव, इयत्ता  9 वी, के.एस.ओ.अलिबाग या विद्यर्थिनीने प्रथम क्रमांक व कु.अविष्कार रविंद्र कदम , इयत्ता  9 वी, डी.के ई.टी. अलिबाग या विद्यार्थाने  द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग,  जिल्हा रुग्णालय, अलिबाग संजय माने  यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इतर सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले.

   कु.स्नेहल सचिन जाधव व कु.अविष्कार रविंद्र कदम यांची  रायगड जिल्हयातून महाराष्ट्र राज्य प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रश्न मंजुषा स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून जिल्हा सहाय्यक लेखा  रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक सौ. रश्मी सुंकले यांनी कामकाज पहिले. सर्व विजेत्यांचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी अभिनंदन केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक