महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

 

 

रायगड दि.15(जिमाका):- राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि.16 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वा.सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने निळगुण ता.माणगावकडे प्रयाण. सकाळी 11 वा.निळगुण ता.माणगाव येथे आगमन व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मौजे निळगुण बामणोली राजीवली रस्ता भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.  सकाळी 11:30 वा. रिळे सामाजिक सभागृह भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास उपस्थित.  दुपारी 12 वा.चापडी उणेगाव रस्ता भूमिपूजन व कापडी सामाजिक सभागृह भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12:30 वा.चापडी ता. माणगाव येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेकडे प्रयाण. दुपारी 12:45 वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे आगमन व रायगड जिल्हा शासन आपल्या दारी कार्यक्रम नियोजनासंदर्भात आढावा बैठकीस उपस्थित. स्थळ:- कॉन्फरन्स हॉल डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, ता. माणगाव.

 दुपारी 2.00 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथून ढालघर, ता.माणगावकडे प्रयाण. दुपारी 2.15 वा. ढालघर, ता.माणगाव येथे आगमन व ढालघरफाटा-लोणसी मोहल्ला-वावे बौद्धवाडी रस्ता भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 2.30 ते 3.00 वा. लोणशी मोहल्ला येथे राखीव. दुपारी 3.00 वा.लोणशी मोहल्ला येथून सुतारवाडी ता.रोहा कडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन राखीव. सायंकाळी 4.00 वा.सुतारवाडी येथून जे.एम.राठी हायस्कूल ता.रोहाकडे प्रयाण. सायंकाळी 4.15 वा. जे.एम.राठी हायस्कूल येथे आगमन व Annual Carnival कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 5.00 वा. जे.एम.राठी हायस्कूल येथून लांढर ता. रोहाकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वा. लांढर ता.रोहा येथे आगमन व अनिल भगत यांचे चिरंजीव किरण यांच्या हळदी समारंभास उपस्थित. सायंकाळी 6.00 वा. लांढर ता. रोह येथून कुडली ता. रोहाकडे प्रयाण. सायंकाळी 6:30 वाजता कुडली ता.रोहा येथे आगमन व संदीप कडू यांच्या रिसॉर्टचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 7.00 वा. कुडली ता. रोहा येथून सुतारवाडीकडे प्रयाण. सोयीनुसार सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक