महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने आरोग्य यंत्रणाशी संबंधित विविध प्रश्न मार्गी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य


रायगड(जिमाका)दि.12 :- जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल,असे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.

रोहा महिला बाल रुग्णालय तसेच जिल्ह्यातील इतर उपजिल्हा रुग्णालयाबाबत विधानभवन नागपूर येथील मा.मंत्री महोदयांचे दालन क्र.206 येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, अवर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मिलींद म्हैसकर,  सार्वजनिक आरोग्य विभाग आयुक्त श्री.धिरजकुमार, सहसंचालक (रुग्णालय),आरोग्य सेवा डॉ.विजय कंदेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने आदि उपस्थित होते.

 भुवनेश्वर ता रोहा, जि.रायगड येथे 100 खाटांचे महिला रुग्णालय नवजात शिशु कक्षासह स्थापन करण्याबाबत शासनाने दि.24 फेब्रुवारी 2022 रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. रुग्णालयासाठी आवश्यक 1 हेक्टर 61 आर जागा आरोग्य विभागाकडे जिल्हाधिकारी रायगड यांच्यामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरीत केली आहे. या 100 खाटाचे रुग्णालय व निवासी गाळे बांधकामाचा आराखडा तयार करुन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तांत्रिक मान्यतेसाठी सादर केला आहे. या कामासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्याकडे  महिला व बालविकास मंत्री आदिती  तटकरे यांनी विनंती केल्यानुसार येत्या अर्थसंकल्पात या बाबतीत आवश्यक ती आर्थिक तरतूद करण्यात यावी असे, आदेश सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी  दिले.

ग्रामीण रुग्णालय तळा जि.रायगड येथील इमारतीसाठी उर्वरीत बांधकामास आवश्यक असणारा रु. 14 कोटी 90 लाख अतिरीक्त निधी व या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात यावी.  त्याचप्रमाणे तळा येथील नियमित 27 पदे व बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पध्दतीवर पदे 1 महिन्यात भरण्यात येतील असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. तळा येथील ग्रामीण रुग्णालयासाठी यंत्रसामग्री बाबत चर्चा केली असता फर्निचरची मागणी जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त निधीमधून पुर्ण करण्यात येईल व यंत्रसामग्रीकरीता सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री सावंत  यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या बांधकामाचा आराखडा जिल्हास्तरीय समिती 15 वा वित्तीय आयोग, रायगड यांनी शिफारस करुन राज्य शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या आरखडयास मान्यता देण्याबाबात महिला व बालविकास मंत्री यांनी विनंती केली असता या आराखड्यास मान्यता देण्याचे आदेश  मंत्री सावंत यांनी दिले.

ट्रॉमाकेअर युनिट उपजिल्हा रुग्णालय, माणगाव सुरु करण्यासाठी शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या ट्रॉमा केअर युनिट व निवासी गाळे बांधकामास प्रशासकीय मान्यता व आवश्यक तरतूद करण्याबाबत आजच्या बैठकीत मंत्री कु. तटकरे यांनी चर्चा केली व त्यानुसार या इमारतीस प्रशासकीय मान्यता व अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करुन देण्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री सावंत यांनी आश्वासन दिले.

 उपजिल्हा रुग्णालय माणगांव, श्रीवर्धन, तळा व म्हसळा याठिकाणी PPP तत्वावर डायलेसीस युनीट उपलब्ध करुन देण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक