राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेलचा बनावट विदेशी स्कॉच व बनावट विदेशी मद्य निर्मिती केंद्रावर छापा जवळपास साडेतेरा लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

 


 

अलिबाग, जि.रायगड,दि.22 (जिमाका):- गुप्त बातमीदाराने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेल, जि.रायगड या कार्यालयालास दिलेल्या बातमीनुसार दि. 20 मार्च 2021 रोजी ईमानूल मर्सिहोम आश्रमच्या बाजूला, नदीकाठी असलेले शेतघर, खैरवाडी, पो. मोर्बे, ता पनवेल जि. रायगड. येथे छापा घातला असता विविध उच्च प्रतीच्या बाटल्यांमध्ये भरणा करुन बनावट विदेशी मद्य (स्कॉच) तयार केलेल्या मद्याच्या सुमारे 750 व 1 हजार मि. ली. क्षमतेच्या एकूण 110 बाटल्या तसेच बनावट मद्य तयार करण्याचे उदा. बुचे, लेबल, टोचे, ब्रश, लॅमिनेशन मशिन इतर साहित्य व महिन्द्रा कंपनीची चारचाकी वाहन व एक ओपो कंपनीची मोबाईल असा एकंदर रुपये 13 लाख 24 हजार 860 किंमतीचा व रोख रक्कम 18  हजार 350 असा मुद्देमाल जप्त केला.

तसेच शिबिन दिनेश तिय्यार, वय २७ वर्षे, सुशिलाल सुकुमार तिय्यार, वय ३३ वर्षे या दोघांना महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 65 (अे) (डी) (ई) (एफ) 81, 83, 86, 90 व 98 अन्वये अटक करण्यात आली आहे. त्यातील फरार आरोपी प्रजीब प्रभाकरण के व जागामालक यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या गुन्हयातील जप्त केलेल्या बनावट विदेशी मद्याची (स्कॉच) कोणकोणत्या भागात विक्री केलेली आहे, याचा तपास सुरु आहे. या गुन्हयामध्ये आंतरराष्ट्रीय टोळीचा समावेश असल्याची दाट शक्यता विभागाने व्यक्त केली आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्री. कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्क, (अंमलबजावणी व दक्षता) संचालक श्रीमती. उषा राजेंद्र वर्मा, राज्य उत्पादन शुल्क विभागीय, उपआयुक्त, कोकण विभाग, ठाणे श्री. सुनिल चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क, अधीक्षक, रायगड- अलिबाग श्रीमती. किर्ती शेडगे, उपअधीक्षक श्री. विश्वजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक श्री. एस. एस. गोगावले, निरीक्षक श्री. अविनाश रणपिसे, निरीक्षक श्री. वामन चव्हाण, दुय्यम निरीक्षक श्री. एस. एस. गायकवाड, दुय्यम निरीक्षक श्री. ए. सी. मानकर, दुय्यम निरीक्षक श्री. व्ही.बी.बोबडे, दुय्यम निरीक्षक श्री.गोविंद पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री.सुभाष जाधव तसेच श्री. पालवे, श्री. संदीप पाटील, जवान श्री.यू.एन.पंची, जवान-नि-वाहनचालक श्री. हाके, महिला जवान श्रीमती. एम. ए. मोरे, श्री. मनोज अनंत भोईर व श्री. अनंत दत्तु जगदाडे या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली. 

या गुन्हयाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक श्री. शिवाजी गायकवाड हे करीत आहेत.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड