दिव्यांगांच्या अनुदानित शाळांमधील मान्यताप्राप्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे प्रतिक्षा यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु

 

अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका)- राज्यातील दि.30 जून 2020 पर्यंत बंद पडलेल्या/रद्द केलेल्या दिव्यांगांच्या अनुदानित विशेष शाळा/कर्मशाळांमधील मान्यताप्राप्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे आयुक्तालयात ठेवण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

त्यानुसार आयुक्तालयाच्या Google forms मध्ये http://bit.ly/Absorptionapplication अशी लिंक कार्यान्वित करण्यात आली असून त्याव्दारे संबंधित मान्यताप्राप्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आवश्यक त्या प्रमाणित कागदपत्रांच्या प्रती अपलोड करून आवश्यक ती माहिती दि.31 मार्च 2021 पर्यंत भरावी. या दिनांकापर्यंत प्रमाणित कागदपत्रांसह परिपूर्ण माहिती वरील लिंकमध्ये न भरल्यास संबंधित समायोजनाबाबत कार्यवाही करणे शक्य होणार नाही. तसेच समायोजनासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव तात्काळ कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे, याची नोंद जिल्हयातील बंद पडलेल्या/रद्द केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घ्यावी, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक